मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde हे राज्याला लाभलेले अतिशय कामसू आणि जनतेची सेवा करणारे मुख्यमंत्री आहेत. जनतेसाठी ते दिवसातले वीस तास सतत काम करत असतात. झोप सुद्धा घेत नाही. त्यामुळे त्यांना दररोज सलाईन लावावी लागते. डॉक्टर त्यांच्या वर्षा या निवासस्थानी तयारच असतात, असे वक्तव्य राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर Education Minister Deepak Kesarkar यांनी नुकतेच केले होते. मुख्यमंत्री सलाईनचा डोस घेऊन काम करत असतील, तर त्याचा आरोग्यावर आणि एकूणच त्यांच्या कामावर कसा परिणाम होऊ शकतो. या संदर्भात आम्ही तज्ञांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत.
सलाईनमुळे थकवा जाईल, झोपेचं काय ? डॉक्टर लाड कोणत्याही व्यक्तीला सर्वसाधारणपणे सहा तास दिवसातून झोप आवश्यक असते. एखादी व्यक्ती जर सातत्याने जागून काम करू लागले, तर त्या व्यक्तीला पित्ताचा त्रास होऊ शकतो प्रचंड थकवा येऊ शकतो. किंवा डोके दुखणे आणि गरगरणे, असा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे जर मुख्यमंत्री सलाईन डोस घेऊन काम करत असतील, तर ते त्यांच्या आरोग्यासाठी हितकारक नाही. सलाईनमुळे त्यांच्या शरीरातील थकवा दूर होईल. मात्र त्यांना आवश्यक असलेली झोप पूर्ण होऊ शकणार नाही. त्याचा त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम दिसू शकेल ते आजारी पडतील. त्यातही पाचशे मिलीची सलाईन जर एखाद्या व्यक्तीला लावायची असेल, तर ती सलाई पूर्ण होण्यासाठी किमान एक तास अवधी लागतो. त्यामुळे हा अवघी सुद्धा लक्षात घेतला पाहिजे, असे प्रतिक्रिया डॉक्टर प्रवीण लाड यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी नियोजन करून प्रशासकीय यंत्रणा राबवली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिंदे गट म्हणून सध्या राज्यभर कार्यरत आहेत. जरी ते शिवसेना म्हणून काम करत असले, तरी त्यांच्याकडे शिंदे गट म्हणूनच पाहिले जाते आणि या गटाचे जे त्यांचे समर्थक 50 आमदार आहेत. या सर्व आमदारांची अपेक्षा आहे. शिंदे यांनी त्यांच्या मतदारसंघात येऊन कार्यक्रम राबवावेत. समर्थकांच्या या अपेक्षा पूर्ण करताना शिंदे यांची दमछाक होत आहे. कारण त्यांना राज्यातील दौरे अन्य कार्यक्रम आणि दररोजचे मुख्यमंत्री म्हणून असलेले शासकीय कामकाज पहावे लागते. शिंदे यांनी जरी सातत्याने लोकांमध्ये फिरून काम करण्याची त्यांची हातोटी असली, तरी एका मर्यादेपलीकडे जाऊन त्यांनी आता अशा पद्धतीचे काम करणे योग्य नाही, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक दिलीप सपाटे यांनी व्यक्त केले आहे.
शिंदे यांनी आता गर्दीतून बाहेर पडावे आणि कामाचे योग्य नियोजन करावे, तरच त्यांना काम करणे शक्य आहे. आणि विश्रांती घेणे शक्य होईल. कारभार करताना त्यांनी प्रत्यक्ष सातत्याने लोकांमध्ये जाणे हाच एकमेव पर्याय नाही, तर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची कार्यप्रणाली राबवावी. तसेच प्रशासकीय यंत्रणेला सोबत घेऊन योग्य नियोजन करून काम केल्यास त्यांच्यावरील हा अतिरिक्त भार कमी होईल. आणि त्यांना सलाईनचा डोस घेऊन काम करण्याची गरज भासणार नाही. यापूर्वीही राज्याच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी सातत्याने काम केल्याची उदाहरणे आणि दाखले आहेत. मात्र अतिरिक्त ताण घेऊन अशा पद्धतीने कोणीही काम केलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कामाचे योग्य नियोजन करावे, असे मत सपाटे यांनी व्यक्त केले आहे.