ETV Bharat / city

Legislative Council Elections : मुंबईत काँग्रेसला फटका, तर भाजपाला फायदा ! - मुंबईत काँग्रेसला फटका

मुंबई महानगरपालिकेतून दोन आमदार विधान परिषदेवर निवडून दिले जातात. २०१२ च्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळ जास्त असल्याने रामदास कदम हे आमदार म्हणून परिषदेवर निवडून गेले. त्यानंतर उर्वरित मते शिवसेनेने भाजपाचे मधू चव्हाण यांना दिली होती. भाजपाची ३१ मते आणि शिवसेनेची मते मिळूनही संख्याबळ गाठता न आल्याने चव्हाण यांचा पराभव झाला होता. त्यावेळी काँग्रेसचे ५२ नगरसेवक निवडून आले होते.

विधान परिषद
विधान परिषद
author img

By

Published : Nov 16, 2021, 3:43 AM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिकेतून विधान परिषदेवर (Legislative Council) दोन सदस्य निवडून दिले जातात. या दोन जागांसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे. या दोन जागांवर काँग्रेस आणि शिवसेनेचे दोन सदस्य सध्या आहेत. मात्र २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसचे कमी संख्येने नगरसेवक निवडून आल्याने येत्या निवडणुकीत काँग्रेसला फटका बसणार आहे. तर भाजपाचे जास्त संख्येने नगरसेवक निवडून आल्याने त्यांचा विधानपरिषदेत एक आमदार वाढणार आहे.

काँग्रेसचे भाई जगताप झाले होते विजयी

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून राज्याच्या विधान परिषदेत आमदार निवडून दिले जातात. मुंबई महानगरपालिकेतून दोन आमदार विधान परिषदेवर निवडून दिले जातात. २०१२ च्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळ जास्त असल्याने रामदास कदम हे आमदार म्हणून परिषदेवर निवडून गेले. त्यानंतर उर्वरित मते शिवसेनेने भाजपाचे मधू चव्हाण यांना दिली होती. भाजपाची ३१ मते आणि शिवसेनेची मते मिळूनही संख्याबळ गाठता न आल्याने चव्हाण यांचा पराभव झाला होता. त्यावेळी काँग्रेसचे ५२ नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसकडून भाई जगताप यांना उमेदवारी देण्यात आली होती. जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ व समाजवादी पक्षाचे ०९ यासह मनसेचे २७, अभासे दोन नगरसेवकांनी मदत केल्याने भाई जगताप विजयी झाले होते.

'काँग्रेसला फटका, भाजपाला फायदा'

२०१७ च्या निवडणुकीत राजकीय परिस्थिती बदलली. काँग्रेसचे विद्यमान आमदार असलेल्या भाई जगताप यांच्या पक्षाची सदस्य संख्या २९ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ व समाजवादी पक्षाचे ६ व शिवसेनेच्या उर्वरित नगरसेवकांची मते मिळाली तरी काँग्रेसच्या उमेदवाराला ६० मते मिळू शकतात. पालिकेतून विधान परिषदेवर एक आमदार निवडून जाण्यासाठी ६९ मत लागतात. काँग्रेसकडे तितकी मते नसल्याने डिसेंबरमध्ये होणाऱ्या परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला आपल्या जागेवर पाणी सोडावे लागणार आहे. यामुळे परिषदेतील काँग्रेसची एक जागा कमी होणार आहे. तर २०१७ मध्ये भाजपाचे ८२ नगरसेवक निवडून आले आहेत. इतर दोन नगरसेवकांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. यामुळे भाजपाचे ८४ नगरसेवक आहेत. डॉ. राम बारोट आणि सुनील यादव यांच्या निधनामुळे दोन जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे भाजपाचे ८१ नगरसेवक आहेत. विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी आवश्यक संख्याबळ असल्याने भाजपाचा एक आमदार परिषदेत जाणार आहे. यामुळे भाजपाचे परिषदेतील संख्याबळ एक जागा वाढणार आहे, अशी माहिती पालिकेतील ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक सुनील शिंदे यांनी दिली.

कोणाला मिळू शकते उमेदवारी?

मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेकडून सध्या विधान परिषदेवर आमदार असलेल्या रामदास कदम यांचा पत्ता कट केला जाऊ शकतो. विरोधी पक्षातील किरीट सोमैया यांना मंत्री अनिल परब यांच्या विरोधात कागदपत्रे दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. यामुळे वरळी मतदार संघात आदित्य ठाकरे यांना निवडून येण्यासाठी त्याग करणारे या विभागाचे माजी आमदार सुनील शिंदे किंवा राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले सचिन अहिर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांचेही नाव चर्चेत आहे. तर भाजपाकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार हे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवीत, असे सांगण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल

शिवसेना – ९७
भाजपा – ८४
काँग्रेस – २९
राष्ट्रवादी – ८
समाजवादी पक्ष – ६
मनसे – १
एमआयएम – २
अभासे – १

निवडणूक कार्यक्रम

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 6 सदस्यांपैकी रामदास कदम आणि अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप या सदस्यांची मुदत दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी मुदत समाप्त होत आहे. त्यासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 16 नोव्हेंबर 2021 (मंगळवार), नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 23 नोव्हेंबर2021 (मंगळवार),
नामनिर्देशन पत्रांची छाननी – 24 नोव्हेंबर2021 (बुधवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 26 नोव्हेंबर 2021 (शुक्रवार), मतदानाचा दिनांक – 10 डिसेंबर2021 (शुक्रवार), मतदानाची वेळ – सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत, मतमोजणीचा दिनांक - 14 डिसेंबर 2021 (मंगळवार), निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक - 16 डिसेंबर2021 (गुरूवार).

हेही वाचा -nawab malik criticize bjp एसटी कामगारांचे आंदोलन भाजप चुकीच्या वळणावर नेत आहे - मंत्री नवाब मलिक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.