मुंबई - जगात सगळीकडेच कोरोनाची साथ आहे. या साथीत अमरावतीतील मेळघाटाासरख्या अतिदुर्गम भागात काय आहे कोरोनाची परिस्थिती ? याबद्दल जाणून घेण्यासाठी पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. रवींद्र कोल्हे यांनी 'ईटीव्ही भारत' शी खास बातचीत केली. यावेळेस त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.
कोरोना काळात तेथील आदिवासी लोकांना आर्थिक चणचण थोडीफार भासली. बाकी शेतीची कामे तसेच तेथील वातावरण यामुळे आदिवासी बांधवापर्यंत कोरोनाची साथ तुलनेने कमी पसरल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आपले वैद्यकीय शिक्षण संपवून शहरात न जाता त्यांनी मेळघाटात धारणी तालुक्यातील बैरागड या गावात आदिवासींची सेवा करण्याचा मार्ग निवडला. आचार्य विनोबा भावे आणि महात्मा गांधीच्या विचारांनी ते प्रेरित झाले. आणि त्यांना नंतर करावा लागलेला संघर्ष त्यांनी या मुलाखतीत मांडला आहे.