मुंबई - विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यावरील दहावी बारावीचा निकालावर परिणाम ( Exam Fever 2022 ) होईल, अशी शक्यता सर्वत्र वर्तवण्यात येत होती. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी 10 जूनपूर्वी दहावी ( SSC Exam Result ) आणि बारावीचा ( HSC Exam Result ) निकाल लावणार असल्याचा विश्वास माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने व्यक्त केला आहे.
राखीव शिक्षकांच्या मदतीने पेपर तपासणार - सध्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची परीक्षा 4 मार्च, 2022 रोजी सुरू होऊन 7 एप्रिल, 2022 रोजी संपली ( SSC exam over ) आहे. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरु होऊन 4 एप्रिल 2022 रोजी संपली ( HSC exam over ) आहे. आता दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षकांकडे पाठवण्यात ( Answer sheets of SSC HSC ) आलेल्या होत्या. मात्र, आपल्या मागण्यासाठी उत्तर पत्रिका तपासणार नाही, असा बहिष्कार राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांना टाकल्यानंतर दहावी-बारावीचा निकाल रखडणार असल्याचे सर्वत्र चर्चा होती.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुण्याचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले की, दोन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही परिक्षांचे निकाल जाहीर होतील. विनाअनुदानित शिक्षकांनी उत्तरपत्रिका न तपासण्याची भूमिका घेतली असली तरी, अनुदानित शाळांमध्ये राखीव शिक्षकांच्या मदतीने पेपर तपासणीचे काम पूर्ण केले जाणार आहे.
राज्यातील 40 हजार शिक्षक लागले कामाला - यंदा दहावीच्या परीक्षेत 16 लाख 40 हजार तर बारावीच्या परीक्षेत 14 लाख 87 हजार विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली आहे. त्यांचे उत्तरपत्रिका तपासणीसाठी 40 हजार शिक्षक राज्यभरात काम करत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी पुरेपूर घेत आहे. त्यामुळे 10 जूनपूर्वी दहावी आणि बारावीचा निकाल लावणार असल्याचा विश्वास माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने व्यक्त केला आहे.
हेही वाचा-Bank of Baroda recruitment : बँक ऑफ बडोदात कृषी मार्केटिंगकरिता 26 जागा, जाणून घ्या सविस्तर माहिती
हेही वाचा-Exam Fever 2022 : सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 25 मे पासून ऑनलाइन आणि ऑफलाइन