ETV Bharat / city

Exam fever 2022 - मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकरांचा सिंधुदुर्गसह रत्नागिरीतील प्राचार्य आणि विद्यार्थ्यांशी संवाद

विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी आदर्श महाविद्यालय येथील ५५ विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. तर २७ तारखेला सायंकाळी ५ वाजता विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपपरिसरातील ४० विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. या विद्यार्थी संवादाच्या कार्यक्रमात विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्न, शंका आणि समस्या उपस्थित केल्या. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरे यावेळी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी दिली.

exam fever 2022 mumbai university vice chancellor suhas pednekar interacts with principals and students in sindhudurg and ratnagiri
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकरांचा सिंधुदुर्गसह रत्नागिरीतील प्राचार्य आणि विद्यार्थ्यांशी संवाद
author img

By

Published : Apr 30, 2022, 8:06 PM IST

मुंबई - मुंबई विद्यापीठाची ध्येय-धोरणे, नाविण्यपूर्ण उपक्रम, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, शैक्षणिक परिक्षण अशा विविध विषयावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर आणि प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी उपपरिसरातील प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

समस्यांचे निराकरण - २५ एप्रिल २०२२ ला दक्षिण रत्नागिरी भागातील फिनोलेक्स एकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्राचार्य संवादासाठी २२ प्राचार्य उपस्थित होते, तर २६ एप्रिल रोजी उत्तर रत्नागिरी भागातील दापोली अर्बन बँक वरिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित केलेल्या बैठकीत ३६ प्राचार्यांशी संवाद साधण्यात आला. २७ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्राचार्य संवादाच्या कार्यक्रमास ४५ विविध महाविद्यालयातील प्राचार्य आणि महाविद्यालयातील व्यवस्थापनाचे ५ प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्व प्राचार्य संवादादरम्यान कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर आणि प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, शैक्षणिक परिक्षण, महाविद्यालयीन स्वायत्तता आणि विविध सांविधिक समित्या अशा अनुषंगिक विषयांवर मार्गदर्शन केले. विविध प्राचार्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि समस्यांचे निराकरण करण्यात आले.

कुलगुरूंनी दिले विद्यार्थ्यांचे प्रश्नांना उत्तर - विद्यार्थी संवाद कार्यक्रमाअंतर्गत २५ एप्रिलला फिनोलेक्स एकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी येथे आयोजित विद्यार्थी संवादात विविध महाविद्यालयातील २५३ विद्यार्थी सहभागी झाले होते. तर २६ तारखेला विद्यार्थी संवाद कार्यक्रमासाठी दापोली अर्बन बँक वरिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास १८६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. २७ एप्रिलला विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी आदर्श महाविद्यालय येथील ५५ विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. तर २७ तारखेला सायंकाळी ५ वाजता विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपपरिसरातील ४० विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. या विद्यार्थी संवादाच्या कार्यक्रमात विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्न, शंका आणि समस्या उपस्थित केल्या. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरे यावेळी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.