मुंबई - एक माजी सैनिक ( ex-soldier ) आपल्या गावाकडील सूत गिरणी ( Yarn Mills Issue ) संदर्भातील मागण्या सरकारकडे मांडण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनाला ( Agitation in Mumbai Azad Maidan ) बसले होते. मात्र त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने माजी सैनिकाने झाडावर चढून आंदोलन ( Agitation by Climbing a Tree ) केले. त्यानंतर या माजी सैनिकाला मंत्रालयात भेटीसाठी पोलिसांनी नेल्याची माहिती मिळत आहे. प्रकाश आबा वाघमारे ( Prakash Aba Waghmare ) असे आंदोलक माजी सैनिकाचे नाव आहे.
- झाडावर चढून आंदोलन
प्रकाश आबा वाघमारे हे माजी सैनिक आपल्या गावाकडच्या सूतगिरणी विषयी विविध मागण्या घेऊन आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. गेले काही दिवस आंदोलन करूनही त्यांच्या आंदोलनाकडे कोणीही लक्ष देत नव्हते. यामुळे आज (सोमवारी) सकाळच्या सुमारास माजी सैनिकाने थेट झाडावर चढून आंदोलन केले. दोन तास झाले तरी ते झाडावरून खाली येत नव्हते. यामुळे पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी माजी सैनिकाला खाली येण्याचे आवाहन केले. तसेच त्यांना खाली आणण्यासाठी शिडी लावल्यावर माजी सैनिक खाली आले. त्यानंतर पोलीस या माजी सैनिकाला घेऊन मंत्रालयात संबंधितांच्या भेटीसाठी घेऊन गेले आहेत.
हेही वाचा - Corona Rules Of Central Government : मोदी सरकारचे नियम चंद्रकांत दादांना मान्य नाहीत का? -हसन मुश्रीफ
हेही वाचा - Fire At Bhaykhala : भायखळा येथील लाकडाच्या गोदामाला आग