ETV Bharat / city

Mumbai Rods close : मुंबईतील 13 रस्ते दर रविवारी घेणार मोकळा श्वास, पोलीस आयुक्तांची संकल्पना - मुंबईतील रस्ते

प्रत्येक रविवारी मुंबईतील १३ रस्ते रविवारच्या सुट्टीसाठी निवडले. निवडलेले १३ रस्ते सकाळी ८ ते ११ या वेळेत बंद राहणार आहे. त्यामुळे या रस्त्यांवर मुलांना स्पोर्ट्स झोनसारखा वापर करता येणार आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना शतपावली करता येणार आहे.

मुंबईतील रस्ते
मुंबईतील रस्ते
author img

By

Published : Mar 26, 2022, 3:45 PM IST

मुंबई - मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी जेव्हापासून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्या तेव्हापासून नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. अनेकदा मुंबईकरांच्या समस्या जाणून घेतात. नुकतेच सोशल मीडियातून नागरिकांनी सुट्टीचा दिवशी रविवारी मुंबईतील रस्ते मोकळे ठेवण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत प्रत्येक रविवारी मुंबईतील १३ रस्ते रविवारच्या सुट्टीसाठी निवडले. निवडलेले १३ रस्ते सकाळी ८ ते ११ या वेळेत बंद राहणार आहे. त्यामुळे या रस्त्यांवर मुलांना स्पोर्ट्स झोनसारखा वापर करता येणार आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना शतपावली करता येणार आहे.

८ ते ११ या वेळेत वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद - २७ मार्चपासून दर रविवारी मुंबईतील मरीन ड्राईव्ह, वांद्रे बँडस्टैंड, ओशिवरा, बोरीवलीसह १३ ठिकाणांवरील रस्ते सकाळी ८ ते ११ या वेळेत वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. हे रस्ते केवळ नागरिकांसाठी खुले असतील. वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यासाठी रविवारी या रस्त्यांचा मुलांना स्पोर्ट्स झोनसारखा वापर करता येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना शतपावली करता येईल. सायकलिंग, योगा, व्यायाम, स्केटींग करता येईल. मुंबईकरांचा प्रतिसाद पाहून दर रविवारी हा उपक्रम आणखी वाढविण्यात येणार असल्याचे वाहतुक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

पार्किंसाठी कल्पना - मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून मुंबईच्या रस्त्यांवर रोज ६०० नव्या कारची भर पडते. याशिवाय असंख्य टॅक्सी धावत असतात. त्यामुळे योग्य पार्किंगची तरतूद नसेल त्याला नवी कार घेता येणार नाही. अशी कार पार्किंगचा पुरावा दाखवल्याशिवाय आरटीओ नोंदवणारच नाही, अशी कल्पना पोलीस आयुक्तांनी मांडली. त्यानंतर मोठी चर्चा झाली, अनेकांनी रविवारी ठराविक वेळेसाठी केवळ नागरिकांसाठी रस्ते खुले ठेवण्याची मागणी केली होती. त्याला प्रतिसाद देत मुंबईतील हे १३ रस्ते रविवारच्या सुट्टीसाठी निवडले.

हे रस्ते १३ असणार बंद - नरीमन पॉईट दोराबजी टाटा रोडवरील २०० मीटरपर्यंत, मुरली देवरा चौक ते एनसीपीएपर्यंत, जमनालाल बजाज मार्ग २७० मीटरपर्यत, मलवार हील हँगींग गार्डन (संपुर्ण बीजीखेर मार्ग) ३०० मीटरपर्यत, बीकेसी अमेरिकन स्कुल ऑफ बॉम्बे ३०० मीटर, वांद्रे बीजे रोड (मन्नत ते बसेरा बंगला) ४०० मीटर, मुलुंड मेरेथॉन अॅव्हेन्यु रोड ६०० मीटर, तानसा पाईपलाइन सायकल गोरेगाव लिंक (मुलुंड रोड ते बिनानगर) २.५ किलोमीटर, विक्रोळी उड्डाणपुल सर्व्हिस रोड ते घाटकोपर उड्डाणपुलाच्या सिग्नलपर्यंत २.५ किलोमीटर, ओशिवरा मिल्लत नगरच्या पाठीमागचा रस्ता ८०० मीटर, दहिसर पश्चिन रंगनाथ केसकर रोड ५०० मीटर, बोरीवली पश्चिम गोराई रोड १,२०० मीटर, गोरेगाव पश्चिम ५०० मीटर आणि अंधेरी लोखंडवाला रोड समर्थ नगर म्हाडा टॉवर ते जॉगर्स पार्क ६०० मीटरपर्यत १३ ठिकाणांवरील रस्ते सकाळी ८ ते ११ या वेळेत वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.