ETV Bharat / city

रंजक इतिहास! मतदान करताना बोट नसेल तर खांद्याला लावली जात होती शाई - शाईचा रंजक इतिहास

भारतात मतदारांनी एकदाच मतदान करावे आणि मतदान केले आहे, हे समजावं यासाठी निळी अथवा काळी शाई मतदारांच्या बोटांवर लावली जाते. यामुळे प्रत्येक नागरिकाला मत देण्याआधी बोटाला ही शाई लावून घ्यावी लागते. गरज पडल्यास खांद्यालाही लावल्या जाणाऱ्या या शाईचा इतिहास मोठा रंजक इतिहास आहे. महाराष्ट्रात सोमवारी होणाऱया मतदानाच्या पार्श्वभूमीवर या शाई बाबत बनवलेला हा खास रिपोर्ट...

मतदान करताना वापरली जाणारी निळी शाईचा इतिहास
author img

By

Published : Oct 20, 2019, 5:37 PM IST

मुंबई - सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. एकूण 96 हजार 661 मतदान केंद्रावर राज्यातील 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. ही सर्व प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. याचाच एक भाग म्हणजे बोगस मतदानाला आळा घालणे, यासाठी मतदारांच्या बोटाला लावली जाणारी निळ्या अथवा काळ्या रंगाची शाई. या शाईचा भारतातील निवडणूक प्रक्रियेत वापर केव्हा आणि कसा सुरू झाला, अशा अनेक प्रश्नांचा ईटीव्ही भारतने घेतलेला वेध.

निवडणुकीतील निळ्या शाईचा इतिहास

मतदानासाठी विशेष शाई वापरण्याची युक्ती अंमलात आणण्याचं संपूर्ण श्रेय भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना जाते. सर्वप्रथम 1962 मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत या शाईचा वापर करण्यात आला. त्याआधी बोटाला फक्त डाय लावला जायचा, नंतर कायमस्वरूपी शाईचा शोध लागला. यानंतर देशात होणार्‍या प्रत्येक निवडणुकीत शाईचा वापर होऊ लागला. हे एक क्रांतिकारक पाऊल होते. त्यावेळी देशातील काही भागात बोगस मतदान होत असल्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. या घटना थांबवण्यासाठी या पद्धतीचा उपयोग करण्यात आला.

हेही वाचा... EVM म्हणजे नेमकं आहे तरी काय..?

शाईची निर्मीती कोठे केली जाते?

भारतात निवडणुकीत वापरली जाणारी शाई ही फक्त भारतातच तयार केली जाते. या शाईचे पेटंट भारत सरकारकडे आहे. शाई तयार करण्यासाठी राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेची महत्त्वाची भूमिका आहे. ही शाई म्हैसूर येथील एका कंपनीमध्ये तयार केली जाते. ‘मैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड’ (एमव्हीपीएल) नावाची कंपनी ही शाई तयार करण्याचे काम करते. या कंपनीत तयार होणारी शाई केवळ सरकार किंवा निवडणूक संस्थांनाच पुरवण्यात येते. ही कंपनी कर्नाटक सरकारच्या अधिकारात असून, देशातील ही एकमेव कंपनी आहे. ही कंपनी जगातील 25 देशांना निवडणुकीसाठी शाई विकते. भारत सरकारसुद्धा निवडणुकीसाठी शाईचा पुरवठा करण्याचे कंत्राट याच कंपनीला देत असते. म्हणूनच निवडणुकीत वापरल्या जाणार्‍या या शाईला म्हैसूरची शाई म्हणून ओळखले जाते.

शाईचे वैशिष्ट्ये

ज्याप्रमाणे हातावर लावली जाते, तशीच ही शाई धातू, लाकूड किंवा कागदावर लावली, तर कितीही प्रयत्न केले, तरी तिला लगेच नष्ट करता येत नाही. कोणत्याही केमिकलचा वापर करूनही शाईला तत्काळ घालवणे शक्य होत नाही. या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट आणि अल्कोहोल यांचे मिश्रण असते, असे सांगितले जात आहे. शाई बोटावर लावताच 15 सेकंदामध्ये तिचा ओलसरपणा नष्ट होतो. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी ती पुसली जात नाही. 15 दिवसांनी ही शाई फिकट व्हायला लागते. ही शाई बोटावर साधारणतः तीन महिने दिसते. नख आणि त्वचा यावर ही शाई लावली जाते, म्हणून ती लवकर जात नाही. निवडणुकीत वापरली जाणारी शाई. ही साधारणतः वांगी रंगाची अथवा काळ्या रंगाची असते.

हेही वाचा... महाराष्ट्रात २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील! ९६७३ केंद्राचे होणार लाइव्ह वेबकास्ट

महाराष्ट्रात निवडणूकीसाठी 3 लाख शाईच्या बाटल्या

एका बाटलीत साधारणपणे 10 मिली शाई असते. 350 मतदारांच्या बोटावर लावता येईल ईतकी शाई या बाटलीत असते. महाराष्ट्रात उद्या सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी तब्बल तीन लाख शाईच्या बाटल्या म्हैसूरहून आणल्या गेल्या. यानंतर त्या बाटल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वितरीत केल्या आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.