मुंबई - महाराष्ट्राने दोन दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्ण संख्येचा 2 लाखांचा टप्पा ओलांडला. सोमवारी राज्यात आढळलेल्या नवीन 5 हजार 368 नवीन कोरोनाबाधितांसह राज्यात आजमितीस 2 लाख 11 हजार 987 कोरोना रुग्ण आहेत. रुग्णांची सातत्याने वाढणारी संख्या म्हणजेच वाढता प्रादुर्भाव ही बाब शासन, प्रशासनासह ठिकठिकाणच्या आरोग्य यंत्रणांच्याकरिता चिंतेची बाब आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे या शहरातील आरोग्य यंत्रणेची कोरोनासोबत लढण्यासाठी केलेली तयारी किंवा आरोग्य यंत्रणेची सध्या असलेली स्थिती, याचा ईटीव्ही भारतने विशेष आढावा घेतला आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रुग्णालयात खाटा आणि रुग्णवाहिका वेळेवर मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत होते. मात्र, पालिका प्रशासनाने प्रत्येक वॉर्डमध्ये वॉर रूम सुरू केले आहेत. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रत्येकी 1 लाख अँटीजन टेस्टिंग किट आणले आहेत. त्याद्वारे टेस्टिंग वाढविण्यावर भर दिला जात आहे. तसेच नाशिक शहरातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जोरदार तयारी केल्याचे दिसत असून शहरात महानगरपालिका आणि जिल्हा रुग्णालयांसोबतच शहरातील 28 खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नागपुरात पहिला कोविडचा रुग्ण ११ मार्च रोजी आढळून आला होता. मात्र, कोविड-१९ चे जागतिक संकट ओळखून शासन आणि प्रसासनाने त्याआधीच प्रभावी उपाययोजना करायला सुरुवात केली होती. ज्यामुळे नागपुरात कोरोनाचा प्रसार फारसा झाला नाही. तर ठाणे जिल्ह्यात महापालिका ही रेड झोनमध्येअसून पालिका आयुक्तांच्या बदलीनंतरही महापालिकेच्या हद्दीतील कोरोनाची परिस्थिती काही बदलताना दिसत नाही.
मुंबई शहर : प्रत्येक वार्डमध्ये वॉर रूम...
सविस्तर वाचा - मुंबईत प्रत्येक वार्डमध्ये वॉर रूम, कोरोनाबाधितांची माहिती मिळताच खाटांसह रुग्णवाहिकेची मिळते सुविधा
पुणे शहर : शहरात सध्या 500 आयसीयूची सुविधा तर 250 व्हेंटिलेटर उपलब्ध...
सविस्तर वाचा - कोरोना व्हायरस: संभावित रुग्णांसाठी पुणे वैद्यकीय प्रशासन सज्ज...
नाशिक शहर : शहरातील 28 खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनासाठी 1,576 बेड्स राखीव...
सविस्तर वाचा - नाशकात शासकीय रुग्णालयांसह 28 खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार
नागपूर शहर : नागपूरच्या शासकीय रुग्णालयात ६०० खाटांचा एक वॉर्ड कोविड रुग्णांसाठी तयार...
सविस्तर वाचा - कोरोनासाठी नागपूर वैद्यकीय प्रशासन सज्ज...परिस्थितीही नियंत्रणात
ठाणे शहर : आयुक्तांच्या बदलीनंतरही महापालिकेच्या हद्दीतील कोरोना परिस्थितीत सुधारणा नाही...
सविस्तर वाचा - विशेष; वाढत्या रुग्णांमुळे प्रशासन हतबल, मनुष्यबळ नसल्यामुळे सर्वच रुग्णालयात अडचणी