ETV Bharat / city

खाकीतली माणुसकी; कॅन्सरग्रस्ताचे साहित्य घेऊन जाण्यास पोलिसाची मदत.. रुग्णाची सुखरूप रवानगी

पोलीस उपनिरीक्षक प्रसन्नजित कदम यांच्या लक्षात आले की या गाडीने प्रवास करण्यासाठी एक कॅन्सर रुग्णसुद्धा रेल्वे स्थानकावर आला आहे. क्षणाचाही विलंब न करता प्रसन्नजित कदम यांनी पुढे येऊन या कॅन्सर रुग्णाला गर्दीतून मार्ग काढीत त्याच्या सर्व सामानाचा बोजा स्वतः वाहत सुखरूप एक्सप्रेस गाडीत बसवून दिले. पोलीस उपनिरीक्षक यांच्या नकळत एकाने हा मदत करतानाच व्हिडिऔ रेकॉर्ड केला. सध्या या पोलीस अधिकाऱ्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

mumbai police
खाकीतली माणुसकी
author img

By

Published : May 19, 2020, 11:56 AM IST

मुंबई - सध्या मुंबईत अडकून बसलेल्या इतर राज्यातील नागरिकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून व्यवस्था करण्यात येत आहे. पोलीस म्हटलं की नागरिकांचा बघण्याचा दृष्टिकोन नेहमीच वेगळा पाहायला मिळत असतो. मात्र, याच खाकीतली माणुसकी पोलीस कसा जपतो याच जीवंत उदाहरण मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पाहायला मिळाले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने कॅन्सर पेशंटचा सामानाचा बोजा वाहून त्याला त्याच्या राज्यात सुखरूप पाठवले आहे.

खाकीतली माणुसकी , कॅन्सर पेशंटचा बोजा वाहून केली त्याच्या राज्यात सुखरूप रवानगी

18 मे रोजी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे माटुंगा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्नजि कदम हे पोलीस अधिकारी कर्तव्यावर हजर होते. या दरम्यान रेल्वे स्थानकावर त्रिपुरा आगरतला एक्सप्रेसने मुंबईत अडकलेले प्रवासी हे त्यांच्या घरी जाण्यासाठी आले होते. यादरम्यान पोलीस उपनिरीक्षक प्रसन्नजित कदम यांच्या लक्षात आले की या गाडीने प्रवास करण्यासाठी एक कॅन्सर रुग्णसुद्धा रेल्वे स्थानकावर आला आहे. क्षणाचाही विलंब न करता प्रसन्नजित कदम यांनी पुढे येऊन या कॅन्सर रुग्णाला गर्दीतून मार्ग काढीत त्याच्या सर्व सामानाचा बोजा स्वतः वाहत सुखरूप एक्सप्रेस गाडीत बसवून दिले. पोलीस उपनिरीक्षक यांच्या नकळत एकाने हा मदत करतानाच व्हिडिऔ रेकॉर्ड केला. सध्या या पोलीस अधिकाऱ्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

संपूर्ण जगभरात कोरोना संक्रमनाणे थैमान घातले असून देशाची आर्थिक राजधानी मुंबईतसुद्धा मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण दरदिवशी आढळून येत आहेत. राज्य पोलीस खात्यातील जवळपास 1206 पोलिसांना कर्तव्य बजावत असताना कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. यात आतापर्यंत 11 पोलिसांचा मृत्यू झाला असून पोलीस खात्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोरोनाचा धोका समजूनसुद्धा नागरिकांना सुरक्षित ठेवण्याची जवाबदारी असलेल्या प्रसन्नजित कदमसारख्या पोलीस कोरोना योद्धाला 'ई टीव्ही भारत'चा सलाम...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.