ETV Bharat / city

Maharashtra Corona Update : ४०५७ नवे रुग्ण, तर ६७ जणांचा मृत्यू

author img

By

Published : Sep 5, 2021, 7:51 PM IST

राज्यात आज ५९१६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्य कोरोना
राज्य कोरोना

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. आज (रविवारी) ५ सप्टेंबर रोजी ४०५७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ६७ मृत्यूची नोंद झाली. राज्यात आज ५९१६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ५०,०९५ सक्रिय रुग्ण -

राज्यात ५९१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,९४,७६७ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ४०५७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ६७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३७,७७४ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४८ लाख ५४ हजार ०१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ८६ हजार १७४ (११.८२ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९९ हजार ९०५ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ५०,०९५ सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्णसंख्येत चढउतार -

गुरुवारी २६ ऑगस्टला ५१०८, शुक्रवारी २७ ऑगस्टला ४६५४, शनिवारी २८ ऑगस्टला ४८३१, रविवारी २९ ऑगस्टला ४,६६६ तर सोमवारी ३० ऑगस्टला ३,७४१, मंगळवारी ३१ ऑगस्टला ४१९६, १ सप्टेंबरला ४४५६, २ सप्टेंबरला ४३४२, ३ सप्टेंबरला ४३१३, ४ सप्टेंबरला ४१३०, ५ सप्टेंबरला ४०५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.

मृत्यूदर २.१२ टक्के -

१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, ९ ऑगस्टला ६८, १२ ऑगस्टला २०८, २५ ऑगस्टला २१६, ३० ऑगस्टला ५२, ३१ ऑगस्टला १०४, १ सप्टेंबरला १८३, २ सप्टेंबरला ५५, ३ सप्टेंबरला ९२, ४ सप्टेंबरला ६४, ५ सप्टेंबरला ६७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात २.१२ टक्के इतका मृत्यूदर नोंदवण्यात आला आहे.

'या' विभागात सर्वाधिक रुग्ण

मुंबई - ४९५
ठाणे पालिका - ६६
नवी मुंबई पालिका - ६९
कल्याण डोबिंवली पालिका - ६१
रायगड - १०२
पनवेल पालिका - ६६
अहमदनगर - ६५२
पुणे - ४२६
पुणे पालिका - २६२
पिपरी चिंचवड पालिका - १५३
सोलापूर - ३६४
सातारा - ५१७
कोल्हापूर - ८९
सांगली - ९७
सांगली मिरज कुपवाडा पालिका - ५१
रत्नागिरी - ४५
उस्मानाबाद - ५६
बीड - ६९

हेही वाचा - चिंताजनक..! कोविड - 19 पीडित गर्भवती महिलांना प्री-एक्लांपसियाचा अधिक धोका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.