नवी दिल्ली : स्त्री सुरुवात आणि शेवट हे फक्त दोन शब्द नाहीत तर ती अस्तित्वाची संपूर्ण कथा आहेत. जगाच्या निर्मितीपासून ते विश्वाच्या अंतापर्यंत त्याच्या वास्तविकतेचे सार आहे. सजीवाच्या जन्म-मृत्यूचे संपूर्ण चक्र शतकानुशतके चालू आहे. इतिहासात तसेच पुराणात स्त्रीचे महत्व सांगितले आहे. गेल्या काही वर्षांपासून आपण जागतिक महिला दिन साजरा करतो. का तर समाजातील महिलेच्या कार्यांचे कौतुक करण्यासाठी तिला सन्मानित करण्यासाठी. आज जागतिक महिना दिनाच्या निमित्ताने ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट...
ईटीव्ही भारतच्या महिलांनीही हेच महिलेचे अस्तित्व कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्रीशिवाय, सृष्टीची कल्पना करणे अशक्य आहे. स्त्रीचं अनेक रुपे. स्त्री ही केवळ त्याग, कार्य आणि प्रेमाची मूर्ती नसून ती यशाची मूर्ती आहे. ती जीवनाचा आदर्श आणि संयमाची प्रेरणा देखील आहे. आज या महिला दिनाच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देतानाच एक माणूस म्हणून किती आपण प्रगती करतोय याचेही भान राखूया.