ETV Bharat / city

जागतिक आदिवासी दिन : आदित्य ठाकरेंनी लुटला आदिवासी नृत्याचा आनंद - Aaditya Thackeray celebrated World Tribal Day

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आरे कॉलनी येथे गेल्या अनेक वर्षापासून हा दिन आदिवासी बांधव एकत्र येत साजरा करत असतात. आपले पारंपरिक नृत्य ते सादर करत असतात. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली व या आदिवासी परंपरेचा आनंद लुटला.

Minister Aaditya Thackeray
आदित्य ठाकरेंनी लुटला आदिवासी नृत्याचा आनंद
author img

By

Published : Aug 9, 2021, 3:14 PM IST

Updated : Aug 9, 2021, 4:50 PM IST

मुंबई - जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज आरे कॉलनी येथे आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने हा दिन साजरा केला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. त्यांनी आरे कॉलनीतील पाड्यामधील नागरिकांसह आदिवसी नृत्य देखील केले. आरे पाड्यातील असलेले प्रश्न लवकर सोडवू, असे आश्वासन देखील आदिवासी बांधवांना आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

हेही वाचा - पिंपरीत आढळला ब्रिटिशकालीन जिवंत बॉम्ब; निकामी करण्याचे काम सुरू

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आरे कॉलनी येथे गेल्या अनेक वर्षापासून हा दिन आदिवासी बांधव एकत्र येत साजरा करत असतात. आपले पारंपरिक नृत्य ते सादर करत असतात. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली व या आदिवासी परंपरेचा आनंद लुटला. आदित्य ठाकरे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन केले. याप्रसंगी नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार रवींद्र वायकर, सुनील प्रभू देखील उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी इतर विषयांवर देखील चर्चा केली.

टास्क फोर्ससोबत बैठक -

आज टास्क फोर्ससोबत बैठक आहे. एकदम सगळं उघडल्यामुळे रुग्णसंख्या मागचेवेळी वाढली होती. काही देशात तिसरी लाट आली आहे. आरोग्य व्यवस्था आपण वाढवत आहोत. त्यामुळे 15 - 15 दिवसाच्या टप्प्याने शिथिलतेबाबत निर्णय घेणार आहोत. रेल्वे प्रवास 15 तारखेपासून दोन डोस घेतलेल्यांना दिलेला आहे.

लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यन्त कोणीही सुरक्षित नाही

पहिल्यांदाच रेल्वेकडून असं उत्तर आलंय की, ही जबाबदारी घेणार कोण? आधीचे रेल्वे मंत्री होते, त्यांनी जबाबदारीने काम केलं होतं. मुंबईसाठी तेव्हा मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टी सुचवल्याप्रमाणे त्यांनी केलं होतं. ज्यांना कोणाला श्रेय घ्यायचे आहे, त्यांनी घ्यावे. मुख्यमंत्री, महाविकास आघाडीचे सरकार श्रेयासाठी काम करत नाही. लोकांची गैरसोय होऊ नये, आणि त्याहून महत्वाचं म्हणजे लोकांचे जीव जाऊ नये. लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. दानवेंचा लसीकरणाला विरोध आहे, त्यांचे राजकारण आहे की अकार्यक्षमता आहे हे मला माहिती नाही. आतापर्यंत रेल्वे मंत्री पूर्णपणे गेले दीड वर्ष सहकार्य करत होते. मला खात्री आहे केंद्रीय कॅबिनेट मंत्री यात सहकार्य करतील. पालिकेकडून सर्टिफिकेट मिळेल आणि ऍपमध्ये नोंदणी होईल, त्या लोकांना आपण परवानगी देणार आहोत. आम्हाला कोणत्याही वादात जायचं नाही. रेल्वे आम्हाला सहकार्य करेल, अशी अपेक्षा आहे. आम्हाला श्रेयवादात न पडता जनतेसाठी कामं करायची आहेत, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

कोविडपासून बचाव करण्याकडे लक्ष

महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात कोणाला भेटीगाठी घ्यायच्या असतील तर घेऊद्या. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्री, आमचे आमदार, खासदार यांचे सगळ्यांचे एकच लक्ष आहे ते म्हणजे, कोविडपासुन लोकांना कसे वाचवता येईल.

पालिकेच्या निवडणुकांकडे सध्या लक्ष नाही, आमचा लोकांचा जीव वाचवण्याकडे लक्ष आहे. काही दिवसांपूर्वी काही राज्यात नद्यांच्या आजूबाजूला बरेच मृतदेह सापडत होते, ते इथे होऊ नये यासाठी आम्ही काम करत आहोत, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा - पोलीस ठाण्यांत मानवाधिकाराला सर्वाधिक धोका - सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा

Last Updated : Aug 9, 2021, 4:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.