दिल्ली / मुंबई - 'पनामा पेपर्स लीक' (Aishwarya Rai Bachchan Panama Papers) प्रकरणात 'ईडी'ने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (ED summoned To Aishwarya Rai Bachchan ED Inquiry ) हिला समन्स पाठवले होते. त्यामुळे तिली आज दिल्लीत बोलावण्यात आले होते. तसेच दिल्लीतील 'ईडी'च्या कार्यालयात दुपारपासून ( Aishwarya Rai Bachchan ED Inquiry ) चौकशी सुरू होती. ही चौकशी संपली असून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन 'ईडी' कार्यालयाबाहेर आली आहे.
अभिनेत्रीने आता स्थगिती मागितली आहे -
आपण चौकशीसाठी हजर राहू शकत नाही (Aishwarya Rai Respond To ED) असे ऐश्वर्याने ईडीच्या विभागाला कळवले होते. सुत्रांच्या माहितीनुसार, अभिनेत्रीने आता स्थगिती मागितली आहे, जी एजन्सीने स्वीकारली आहे. त्यानुसार आता तिला हजर होण्यासाठी नवीन तारीख दिली जाण्याची शक्यता होती. मात्र, तसे न होता ती आज ईडीच्या कार्यालयात हजर झाली आहे.
प्रत्येक वर्गातील नामवंत व्यक्तींची नावे आहेत
पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबाचे नावही समोर आले होते. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने ( Enforcement Directorate Delhi ) या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता. अंमलबजावणी संचालनालयाचे एचआययू या प्रकरणाची चौकशी करत आहे. पनामा पेपर्स प्रकरणात (Panama Papers Leak Case 2021) भारतातील सुमारे 500 लोकांचा समावेश होता. यामध्ये देशातील नेते, चित्रपट अभिनेते, खेळाडू, उद्योगपती, प्रत्येक वर्गातील नामवंत व्यक्तींची नावे आहे. या सर्व लोकांवर करचुकवेगिरीचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण ?-
अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन, डीएलएफचे केपी सिंह, इक्बाल मिर्ची आणि उद्योगपती अडाणी यांच्या ज्येष्ठ बंधूचा पनामा पेपर्समध्ये समावेश ( Indians Name In Panama Paper leak Case ) आहे. या प्रकरणात बच्चन कुटुंबीयांचे नाव समोर येताच मनी लॉड्रिंगचाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी केली जात आहे. या यादीमध्ये ३०० भारतीयांची नावे आहेत. त्यात बच्चन कुटुंबीतील अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन यांचा समावेश आहे. तसेच, बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा देखील समावेश असल्याचे म्हटले जाते.
भारतासहित २०० देशांमधील राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटी यांचा समावेश
पनामा पेपर लीक प्रकरणात एका कंपनीचे काही पेपर लीक झाले होते. हा डेटा एका जर्मन न्यूजपेपरने पनामा पेपरच्या नावाने (३ एप्रिल २०१६)मध्ये रिलिज केला होता. यामध्ये भारतासहित २०० देशांमधील राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटी यांचा समावेश होता. त्यांच्यावर मनी लॉंड्रिंगचा आरोप करण्यात आला होता.
जागतिक शोध पत्रकार समूहात तब्बल 78 देशातील 107 पत्रकार संघटनांचा समावेश
ऑर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) आणि इंटरनॅशनल कंझोर्टियम ऑफ इनव्हेस्टिगेटीव जर्नालिस्ट्स (ICIJ) या दोन प्रकल्पातील पत्रकारांनी घेतलेल्या शोधमोहीमेतून ही माहिती समोर आली आहे. जागतिक शोध पत्रकार समूहात तब्बल 78 देशातील 107 पत्रकार संघटनांचा समावेश आहे. यामध्ये भारतातील इंडियन एक्स्प्रेस असल्याचे सांगितले जात होते.
हेही वाचा - Year in Review 2021 : मुंबईतील गुन्हेगारी जगतातील महत्वाच्या घडामोडींचा आढावा...