मुंबई - एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मोठा दिलासा मिळाल आहे. दया नायक यांच्या बदलीला मॅटकडून स्थगिती मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दया नायक हे आहे त्याच पदी कायम राहणार आहेत. नायक यांची गोंदियाला बदली करण्यात आली होती.
गोंदियाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी उपसमितीच्या कार्यालयात दया नायक यांची बदली करण्यात आली होती. या बदलीला मॅटकडून स्थगिती देण्यात आली आहे.