मुंबई - दोन दिवसापूर्वीच जागतिक आदिवासी दिन साजरा झाला. आदिवासी युवक मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठीच मुंबईत येऊन मूर्तिकलेचे धडे ते गिरवीत आहेत. मुंबईतील मूर्तिकार कुणाल पाटील यांच्या गणेश मूर्तीशाळेत कामासाठी हे युवक आले आहेत. याबाबतचा आढावा खास आढावा.
आदिवासी बहुल अशी पालघर जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, या भागात रोजगार नसल्यामुळे येथील काही आदिवासी युवकांनी मुंबईत जाऊन मूर्तिकलेचे प्रशिक्षण घेण्याचे ठरवले. मूर्तिकार कुणाल पाटील यांच्या मूर्तीशाळेत सुरुवातीला पांडुरंग नावाचा मुलगा आला आता तब्बल 30 जण या मूर्तीशाळेत प्रशिक्षण घेत आहेत. सर्व युवक पालघर जिल्ह्यातील वाडा या गावातील आहेत. माती काम, फिनिशिंग अशी सर्व काम हे युवक करतात. त्यांना मूर्तिकलेची आवड आहेत. आम्ही पण त्यांना मार्गदर्शन करतो असे के. पी. आर्टच्या गोरांक गोवेकर यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यात रोजगाराची समस्या आहे. मी 2015 साली मुंबईत आलो. इथे आल्यापासून खूप बदल झाला. आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. इकडे मिळणारा पैसा मी शेतीत गुंतवतो. गाडी घेतली. पहिला 'ग' गणपतीचा ही माहीत नव्हता पण आता खूप काही शिकायला मिळाले असे एका आदिवासी मुलाने सांगितले.
या कामामुळे खूप बदल झाला आहे. मी 15 वर्षापासून काम करत आहे. खूप काही शिकायला मिळाले. आम्ही सगळी कामे करतो. योग आला तर नक्कीच स्वतःची मूर्तीशाळा खोलू असे लाडक्या परब याने सांगितले. आदिवासी मुलांमध्ये मूर्तिकलेबाबत प्रेम निर्माण झालं आहे, भविष्यात त्यांना उत्तम संधी प्राप्त होतील. तीन महिने ते येथे वास्तव्यास असतात, असे कुणाल पाटील म्हणाले.