ETV Bharat / city

बेस्टच! कोरोनासोबत तंबाखूवरही मात - मुंबई लेटेस्ट न्यूज

कोरोनासोबत बेस्टने तंबाखूवरही मात केली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत बेस्ट उपक्रमातील ५ हजारपेक्षा जास्त बेस्ट कर्मचारी तंबाखू मॅजिक मिक्स चूर्णापासून तंबाखू मुक्त झालेले आहेत. याबाबतचा ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट..

Employees of BEST have successfully tried to overcome tobacco addiction
बेस्टच! कोरोनासोबत तंबाखूवरही मात
author img

By

Published : May 31, 2021, 4:11 PM IST

मुंबई- कोरोना काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी बेस्ट बसेस रस्त्यावर धावत होत्या. मात्र, मोठ्या प्रमाणात बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. विशेष म्हणजे या कोरोनबांधित कर्मचाऱ्यांमध्ये सात टक्के तंबाखूचे व्यसन करणाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे त्यांच्या आरोग्याला जास्त भीती असल्याने अशा, कर्मचाऱ्यांचे योग्य समुपदेश करू आणि त्यांना बेस्ट निर्मिती मॅजिक मिक्स नावाचे चुर्ण देऊन त्यांना तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न बेस्टचा आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत बेस्ट उपक्रमातील ५ हजारपेक्षा जास्त बेस्ट कर्मचारी तंबाखू मॅजिक मिक्स चूर्णापासून तंबाखू मुक्त झालेले आहेत.

बेस्टचा मॅजिक मिक्सचा फॉर्म्युला? -

गेल्या काही वर्षांपासून बेस्ट कर्मचार्‍यांमध्ये वाढते तंबाखूचे व्यसन ही गंभीर समस्या बनली आहे. बेस्टमध्ये चालक, कंडक्टर वर्गाकडून पान, तंबाखू, सुपारीचे मोठ्या प्रमाणात सेवन होते. त्याचा परिणाम बेस्टचा बसगाड्यांबरोबर कार्यालयीन इमारती, बस आगार येथे दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांनी तंबाखूचे सेवन न करण्याचे आवाहन यापूर्वी अनेकदा करण्यात आले होते. इतकेच नव्हेतर अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा विभागीय स्तरावर देण्यात आले होते. तरी सुद्धा तंबाखूचे व्यसन करण्याची संख्या कमी होत नव्हती. यामुळे बेस्टच्या आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार सिंघल यांनी मॅजिक मिक्सचा फॉर्म्युला तयार केला होता. जे कर्मचारी तंबाखूचे व्यसन करतात अशा कर्मचाऱ्यांना मॅजिक मिक्स चूर्ण देण्यांत आले आहे. यामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांना फायदा सुद्धा झालेला आहे. आज बेस्टमध्ये जवळ जवळ ५ हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी तंबाखू मुक्त झाले आहेत, अशी माहिती डॉ. अनिलकुमार सिंगल यांनी ईटीव्ही भारताला दिली आहे.

बेस्टच! कोरोनासोबत तंबाखूवरही मात
कोरोनात मॅजिक मिक्सची जादू -

जगभरात होणाऱ्या मृत्यूपैकी तंबाखूचे सेवन हे आघाडीचे कारण असून एकट्या भारतामध्ये सुमारे १३.५ लाख लोकांचा दरवर्षी तंबाखूच्या व्यसनामुळे अकाली मृत्यू होतो. तंबाखूचे व्यसन/धुम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये कोविडचे घातक परिणाम दिसून आलेला आहे,मात्र, तंबाखू सोडणारे रुग्ण गंभीर ते अतिगंभीर कोविडच्या आजारावर मात करून बरे झालेले आहेत. बेस्टमध्ये गेल्या एका वर्षांत ३ हजार ४३८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यापैकी ७.८ टक्के कर्मचारी तंबाखूचे व्यसन होते. ज्यांची संख्या २७० इतकी होती. मात्र, तंबाखूचे व्यसन असलेल्या या कर्मचाऱ्यांना सुद्धा बेस्टचा आरोग्य विभागाने योग्य प्रकारे समुपदेश करू आणि मॅजिक मिक्सचे चूर्ण देऊन त्यांना कोरोनाबरोबर तंबाखू व्यसनापासून मुक्त केले आहे. तंबाखूमध्ये असणारा निकोटीन हा घटक सवय जडण्यास कारणीभूत असून ९७ टक्के व्यसनी व्यक्तींना त्याच्या तलफेच्या होणाऱ्या त्रासामुळे तंबाखूचे व्यसन सोडणे कठीण वाटते. मॅजिक मिक्स तंबाखूचे व्यसन सोडण्यास मदत करते, मॅजिक मिक्सने बेस्टच्या कर्मचाऱ्यांमध्ये तंबाखू सोडण्यासाठी जादुई परिणाम साधलेला अशी माहिती सुद्धा डॉ. अनिलकुमार सिंगल यांनी दिली आहे.

असे आहे मॅजिक मिक्स चूर्ण -

बेस्टचा मॅजिक मिक्सचा फॉर्म्युल्यामध्ये दालचिनी, ओवा, बडीशेप आणि लवंगचा समावेश आहे. ज्यामध्ये २५ ग्रॅम दालचिनी, २५ ग्रॅम जिरे, २५ ग्रॅम ओवा, २५ ग्रॅम बडिशेप, ४ ते ५ लवंग यांचे मिश्रण करून त्यांचे चूर्ण तयार केले जाते. हे चूर्ण दिसायला तंबाखूसारखे दिसते. हे चूर्ण खाल्यानंतर तंबाखू खाल्ल्याचे समाधान व्यसनकर्त्यांना होते. विशेष म्हणजे तंबाखूला पर्याय म्हणून व्यसनकर्त्यांना चुना म्हणून तांदळाचे पिठ देण्यात आले आहे. दिवसातून मॅजिक मिक्स २० ग्रॅमपेक्षा जास्त खायचे नाही. मॅजिक मिक्स चूर्ण थुंकण्याची गरज नाही, उलट हे गिळल्यास शरीरासाठी फायदाच आहे. असे सुद्धा डॉक्टर सिंगल यांनी सांगितले आहे.

दरवर्षी ९० हजार कर्करोग रुग्णाची भर-

जगामध्‍ये दरवर्षी जवळपास ६० लाख लोकांचा मृत्‍यू हा तंबाखू सेवनाने होतो. अभ्‍यासानुसार २०३० पर्यंत जगामध्‍ये ८० लाखापेक्षा जास्‍त लोकांचा मृत्‍यू तंबाखूच्‍या सेवनामुळे होण्‍याचे भाकित व्‍यक्‍त करण्‍यात आले आहे. विशेष म्हणजे मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या अहवालानुसार तंबाखूपासून तोंडाचा कर्करोग होणाऱ्यांची संख्या देशभरात जास्त आहे. विशेष म्हणजे दरवर्षी ९० हजार लोकांना तंबाखूमुळे तोंडाचा कर्करोग जडतो आहे. आपल्या कुटुंबियातील सदस्य तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत असले तर त्यांना योग्य समुपदेश देऊन तंबाखू मुक्त करावेत असे आवाहन जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त डॉ. अनिलकुमार सिंगल यांनी नागरिकांना केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.