मुंबई: विश्वगुरूकडे मार्गक्रमण भारत करत आहे. जगाला दिशा देत आहे असे सांगितले जात आहे. आणि अशा महान लोकशाही असलेल्या भारतात महाराष्ट्र नावाचं प्रगतिशील राज्य आहे, School Electricity आणि या राज्यांमध्ये प्रत्येक सरकार छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आणि आंबेडकर या महामानवांना वंदन करूनच कारभार करते. मात्र या प्रगतिशील राज्याला मान खाली घालवणारी घटना म्हणजेच राज्यामध्ये 14 हजार 900 शाळा विजे विना आहेत. Digital India plan on paper या शाळांमध्ये विजपुरवठाच नाही. पंतप्रधान यांनी घोषणा केलेल्या डिजिटल इंदियाला वास्तवात कसे उतरवायचे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. याबाबत शिक्षण क्षेत्रातून प्रखर टीका शासनावर केली जात आहे.
पंतप्रधानांची महत्त्वकांक्षी डिजिटल इंडिया योजना कागदावरच राज्यामध्ये खाजगी सरकारी मिळुन एकूण 1,10,114 शाळा आहेत. या एकूण शाळांपैकी 95,156 शाळांमध्ये वीजपुरवठा कार्यरत आहे. याचा अर्थ 14,958 शाळांमध्ये वीजपुरवठा नसल्याची बाब उघड झालेली आहे. तर राज्यात एकूण सरकारी शाळांची संख्या 2021- 22 च्या केंद्रशासनाच्या अहवालानुसार 65 हजार 734 इतकी आहे. त्यापैकी 61 हजार 89 शाळांमध्ये विजेची उपलब्धता आहे. म्हणजे 4000 शाळांमध्ये वीज उपलब्ध नाही. तर वीज कार्यरत फक्त 51,507 शाळांमध्ये आहे. ही माहिती केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. तर एकूण सरकारी शाळा 65,734 पैकी फक्त 51 हजार 507 शाळांमध्ये वीजपुरवठा कार्यरत आहे. याचाच अर्थ 14 हजारापेक्षा अधिक सरकारी शाळांमध्ये वीजपुरवठा नाही. तर राज्यामध्ये एकूण खाजगी अनुदानित शाळांची संख्या 23 हजार 924 आहे, आणि त्यापैकी 23,654 शाळांमध्ये विजेची उपलब्धता आहे. प्रत्यक्ष वीज कार्यरत 23 हजार 484 शाळेमध्येच आहे. याचा अर्थ खाजगी अनुदानित एकूण शाळांपैकी 440 शाळांमध्ये अद्यापही वीजपुरवठा नाही. याबाबत या शाळेतील समर्थ वऱ्हाडे इयत्ता चौथी मधील विद्यार्थी देखील कळकळीने शिक्षण मंत्र्यांना आवाहन करतो आहे. कि आमची शाळा बंद करू नका. खूप वर्षेपासून आमच्या शाळेची वीज कनेक्शन तोडले आहे. आमच्या शाळेत वीज पुन्हा सुरु करा.
सरकार बजेट कुठे खर्च करतं खाजगी विनाअनुदानित शाळांच्या संदर्भात राज्यामध्ये त्यांची संख्या एकूण 19,632 आहे. त्यापैकी वीज उपलब्धता 19462 आहे. म्हणजे इथे पण 200 ने फरक आहे, तर एकूण शांत पैकी 19350 शाळांमध्येच वीजपुरवठा आहे. 285 शाळांमध्ये वीजपुरवठा नाही आहे. याबाबत ईटीवीद्वारे प्रत्यक्ष वाशिम जिल्ह्यातील तालुका वाशिम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाव मसला बुद्रुक येथे भेट देऊन पाहणी केली असता, तेथील वास्तव समोर आले. या शाळेला 50 हजार रुपये विजेचे बिल आलेलं आहे, आणि ते भरलं नाही. त्यामुळे अनेक वर्षापासून वीजपुरवठा खंडित आहे. तसेच ही शाळा विजेविना चालवली जाते. यामुळे डिजिटल शिक्षण ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा अशा हजारो शाळांमध्ये वास्तवात उतरलेली नाही. वीजच नाही तर डिजिटल रूम काय कामाची. वीजच नाही. मुलांना संगणकाद्वारे काय आणि कसे शिक्षण मिळणार आणि जगाशी त्यांचे नाते कसे जोडले जाणार. या शाळेची वीज होती. मात्र बिल न भरल्याने वीज जोडणी तोडली गेली आहे. असे त्या भागातील सत्यशोधक शिक्षक सभा संघटनेचे कार्यकर्ते गजानन धामणे यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना कळकळीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच सरकार बजेट खूप ठेवल असे सांगते, तर आता बजेट गेल कुठे, असा जळजळीत सवाल देखील ते करत आहेत.
शिक्षण मंत्र्यांची कबुली तर शिक्षण तज्ञांची प्रखर टीका यासंदर्भात महाराष्ट्र शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना विचारले असता त्यांनी कबुली दिली की, एवढ्या शाळांमध्ये बीजेपुरवठा नाही, ही बाब खरी आहे. मात्र हजारो शाळांचे विज बिल थकले असल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा महावितरणाने खंडित केलेला आहे. त्याच्यामुळे अनेक शाळांचा वीजपुरवठा सध्या नाही आहे. पण त्यावर उपाय म्हणून ऊर्जेचा सौर ऊर्जेचा वापर आम्ही करणार आहोत. त्या संदर्भात शासनाकडे प्रस्ताव विचाराधीन आहे. पुढील काही काळामध्येच लवकरात लवकर या सर्व हजारो शाळा ज्या आहेत. त्या सौरऊर्जेने पुन्हा सुरू होतील, अशी खात्री त्यांनी ईटीव्ही भारतसोबत सोबत संवाद साधताना दिली. तर शिक्षण तज्ञ अरविंद वैद्य यांनी शासनाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले नवीन शिक्षण धोरणाचा हा परिपाक आहे. कोरोना येईपर्यंत नवीन शिक्षण धोरणात कुठेहि ऑनलाईन शिक्षणाचा लवलेश नव्हता. मात्र कोरोनानंतर छुप्या रीतीने डिजिटल संकल्पना आणली. कोर्पोरेट धार्जिणी नीती आहे. सर्व सरकारी शाळा बंद करण्याचा मनसुबा केंद्र आणि राज्य सरकारचा आहे. त्यामुळे हजारो शाळा या विजेविना आहे. जर केंद्र आणि राज्य शासनाला खरोखर काळजी असती, तर इतके वर्षे जिल्हा परिषद शाळा वीजजोडणी वाचून कशी राहिल्या. तसेच जोडणी असेल. मात्र वीज बिल थकलं, म्हणून कनेक्शन तोडले. त्यावर सरकार उपाय करत नाही, अश्या या शासनाला काय अर्थ आहे.