मुंबई : आज होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या Eknath Shinde Dasara Melava तयारीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमएमआरडीए मैदानाला भेट Eknath Shinde visited MMRDA Ground दिली.
बीकेसी मैदानात मेळावा - एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा ( Dasara Melava of Eknath Shinde Group ) हा मुंबईतील बीकेसी मैदानात पार पडणार ( BKC Ground Mumbai ) आहे. यावेळी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी मैदानात सुरू असलेल्या कामांची पाहणीसुद्धा केली होती. शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर यंदा प्रथमच शिवसेनेच्या दोन गटांचा मुंबईत दोन ठिकाणी दसरा मेळावा ( Two Factions of Shiv Sena are Holding Dasara Melava ) होत आहे. बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे.
पार्किंग भाडे तत्त्वावर आरक्षित - बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने जोरदार तयारी आता पूर्णत्वाला आली आहे. ( Shinde Camp Dasara Melava ). राज्यभरातून येणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. ये-जा करणाऱ्या मार्गावर पार्किंगमुळे रस्ते वाहतुकीचा होणारा बोजवारा टाळण्यासाठी शिंदे गटाने आजूबाजूच्या खाजगी कार्यालयांचे पार्किंग भाडे तत्त्वावर आरक्षित केले आहे. ( Shinde Reserved Parking For Dasara Melava). या सर्व तयारीसाठी लाखो रुपयांचा खर्च येणे अपेक्षित आहे. बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने जोरदार तयारी सुरू केली होती.