मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यावेर चिंता व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये, काळजी घेणार. आत्महत्या होऊ नये यासाठी बँका आणि संबंधित यंत्रणांशी चर्चा करून आराखडा करण्याच्या सूचना दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. आज औरंगाबाद येथे बोलताना एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा - महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाला सर्वोच्च न्यायालयाची 'तारीख पे तारीख'
100 कोटी रुपयांपर्यंत निधी लागणाऱ्या रस्त्यांची कामे होतील - एकनाथ शिंदे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना काय निर्णय घेतील, कोणत्या घोषणा करतीय याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या हा मोठा प्रश्न आहे, तसेच पाण्याची देखील समस्या आहे. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता होते. या पार्श्वभूमीवर सरकारकडून काही ठोस निर्णय नागरिकांना अपेक्षित होते. शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही, यासाठी काळजी घेणार असल्याचे म्हटले. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे शिंदे म्हणाले. त्याचबरोबर, शिंदे यांनी विविध घोषणा केल्या. 100 कोटी रुपयांपर्यंत निधी लागणाऱ्या रस्त्यांची कामे होतील, तसेच नांदेड जालना समृद्धी महामार्ग करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच, नद्या वळवून जमीन ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
संकेत सलगरला ३० लाख रुपयांचे पारितोषिक - कॉमनवेल्थ स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या रौप्य पदक विजेता संकेत सलगर या खेळाडूला 30 लाख रुपयांचे पारितोषिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर केले. मुंडे याच्या स्मारकाविषयी त्यांनी भाष्य केले. स्मारकाच्या कामाला चालना देणार असल्याचे शिंदे म्हणाले. स्मारका आड येणाऱ्या अडचणी दूर करू, असेही ते म्हणाले. हिंगोलीती कुरुंदा गावाचे पुनर्वसन करणार, असे शिंदे म्हणाले. औरंगाबाद पाणि प्रश्नावर त्यांनी भाष्य केले, तसेच औरंगाबादमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला मुख्यमंत्र्यांनी घेतला.
हेही वाचा - India corona Update : कोरोना रुग्णसंख्येत घट, २४ तासात १९,६७३ रुग्ण