मुंबई: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे ( controversial statement ). महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari ) यांनी केले होते. या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे म्हणाले, मी त्यांच्या मताशी सहमत नाही.
त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत राज्यपालांवर टीका केली आहे. तर, राज्यपालांनी नको त्या गोष्ट्रीत नाक खुपसू नये, गुण्या गोविंदान नांदावं असा सल्ला मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिला आहे.
हेही वाचा - Governor Bhagat Singh Koshyari : राजकीय वातावरण तापल्यावर अखेर काय म्हणाले राज्यपाल