ETV Bharat / city

Eknath Shinde Maharashtra CM : शिवसेना शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांचा थक्क करणारा प्रवास - एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार ( Eknath Shinde Maharashtra CM ) आहेत. शाखाप्रमुख थे मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल जाणून ( Do You Know Who Is Eknath Shinde ) घेऊया.

Eknath Shinde
Eknath Shinde
author img

By

Published : Jun 30, 2022, 5:52 PM IST

मुंबई - शिवसेनेचे नेते व माजी मंत्री व आता सध्याचे शिवसेनेचे बंडखोर नेते म्हणून नावारूपाला आलेले एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत युती केल्यामुळे ते आता राज्याचे २५ वे मुख्यमंत्री झाले ( Eknath Shinde Maharashtra CM ) आहेत. एकनाथ शिंदे यांचा जीवनप्रवास कसा आहे त्याबद्दल आपण जाणून ( Do You Know Who Is Eknath Shinde ) घेऊया....

आनंद दिघे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा झेंडा हाती घेतला - एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर क्र. ३ येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. २३ येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथीलच मंगला हायस्कूल येथे झाले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता. ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होतं होती. समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता. अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे. सन १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता.

शिक्षणाची जिद्द - गरीब परिस्थितीशी सामना करत त्यांनी मंगला हायस्कूलमधून ११ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. परंतु, शिकण्याची जिद्द आणि इच्छा मात्र प्रबळ होती. त्यामुळेच आयुष्यात काहीसे स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. सन २०१४ ते २०१९ हा पाच वर्षांचा कालावधी राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी धामधुमीचा ठरला असला, तरी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे पुढील अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवले. नुकतीच त्यांनी मराठी आणि राजकारण हे दोन विषय घेऊन तृतीय वर्ष बीएची परीक्षा दिली आणि ७७.२५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. परिस्थितीमुळे तरुणपणी स्वतःला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. तरी त्यांनी मुलगा श्रीकांत याला जिद्दीने शिकवले आणि डॉक्टर केले. श्रीकांत एकनाथ शिंदे हे एमएस (ऑर्थो) असून कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

राजकीय कारकीर्द - एकनाथ संभाजी शिंदे हे शिवसेना नेते असून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते. या आधी २०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. २०१९ च्या सुरुवातीपासून त्यांनी आरोग्य खात्याची देखील जबाबदारी सांभाळली. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा ( २००९, २०१४ आणि २०१९) आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकदा ( २००४ ) असे चार वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते १९८० च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले. एका साध्या शाखाप्रमुखापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आणि कठोर मेहनत, धडाडी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटापर्यंत घेऊन जाण्याची धमक या वैशिष्ट्यांमुळे शिवसेना नेतेपदापर्यंत व आता मुख्यमंत्री म्हणून त्यांची वाटचाल झाली आहे.

बंडखोरीचं इनाम मुख्यमंत्रीपद?- शिवसेनेची बंडखोरी करत भाजपशी हात मिळवणी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. आम्ही शिवसेनेसोबत असून, बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या विचाराने आम्ही प्रेरित आहोत. बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या प्रेरणेने आम्ही यापुढेही शिवसेने सोबतच राहणार आहोत, असे सांगत आहेत. परंतु, एकनाथ शिंदे यांच्याकडे आताच्या घडीला ३९ शिवसेनेचे आमदार व ११ अपक्ष आमदारांचा पाठिंबा असे एकूण ५० आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेनेतील ताकद पाहता. याचा पुरेपूर फायदा भाजपने घेतला असला तरी भाजपने सुद्धा मोठ्या मनाने त्यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले. तरी यामधील राजकीय कारण बरीच आहेत.

हेही वाचा - Eknath Shinde CM : 'फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक'; एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.