मुंबई - महाविकास आघाडी सरकारने MVA Government राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची दिलेली यादी रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी केली आहे. मात्र यासोबतच एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षातील Bjp नेत्यांकडून राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये आपले नाव येण्यासाठी जोरदार लॉबिंग Eknath Shinde group and BJP leaders start lobbying for Legislative Council सुरू झाली आहे. त्यामुळे कोणत्या नेत्यांची राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत वर्णी लागते हे लवकरच समजणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले राज्यपालांना पत्र राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी महाविकास आघाडी सरकार MVA Government असताना राज्यपालांना देण्यात आली होती. मात्र ती यादी रद्द करावी, असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी राज्यपालांना दिले आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार MVA Government असताना राज्यपाल नामनिर्देशित 12 सदस्यांची नियुक्ती राज्यपालांनी तात्काळ करावी, अशी मागणी त्या वेळी महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari यांच्याकडे केली होती. मात्र जवळपास दीड वर्ष राज्यपालांनी या बारा सदस्यांवर कोणताही निर्णय घेतला नाही. यावरून महाविकास आघाडी सरकार असताना राज्यात मोठे राजकीय रणकंदन ही झाले. मात्र तरीही राज्यपालांनी यादी मंजूर केली नव्हती.
कोण होणार ते 12 आमदार, उत्सुकता शिगेला आता राज्यांमध्ये सत्तांतर झाले असून, एकनाथ शिंदे गट Eknath Shinde Group आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आहे. त्यामुळे नव्या सरकारकडून नवीन नामनिर्देशीत 12 सदस्यांची यादी लवकरच राज्यपालांना दिली जाणार आहे. आधीच्या महाविकास आघाडी सरकारने MVA Government दिलेल्या 12 नावांची यादी रद्द करावी असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना लिहिले आहे. त्यामुळे नवीन सरकारचे बारा सदस्य राज्यपाल नियुक्त करतील, अशी दाट शक्यता आहे. पण त्यासोबतच नव्या सरकारमधले ते बारा सदस्य कोण याबाबत देखील आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी या नावाची चर्चा राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांपैकी एकनाथ शिंदे गट Eknath Shinde Group आणि भारतीय जनता पक्षाचे मिळून सहा उमेदवार देण्यात यावे, या बाबतीत सध्या दोन्हीकडून चर्चा सुरू आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये आपले नाव असावे यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून काही माजी आमदार खासदारांकडून लॉबिंग Eknath Shinde group and BJP leaders start lobbying for Legislative Council सुरु झाल्याची देखील चर्चा आहे. यामध्ये माजी मंत्री रामदास कदम, माजी मंत्री अर्जुन खोतकर, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, अभिजीत अडसूळ, माजी मंत्री विजय शिवतारे, चंद्रकांत रघुवंशी आणि शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावस्कर यांची नावे सध्या चर्चेत असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळते.
पंकजा मुंडे, माधव भंडारींना मिळणार आमदारकी ? भारतीय जनता पक्षाकडून माजी मंत्री पंकजा मुंडे, प्रवक्ते माधव भंडारी यांची नावे सध्या चर्चेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून राजकीय विजनवासात असलेल्या पंकजा मुंडे या पुन्हा आमदार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे. तर माधव भंडारी यांच्यावरही भाजप पुन्हा विश्वास टाकणार असल्याचेही बोलले जात आहे.
महाविकास आघाडी सरकार असताना दिलेल्या बारा नावांची यादी -
शिवसेना- उर्मिला मातोंडकर, विजय करंजकर, नितीन बानगुडे पाटील, चंद्रकांत रघुवंशी
राष्ट्रवादी काँग्रेस- राजू शेट्टी यशपाल भिंगे एकनाथ खडसे आनंद शिंदे
काँग्रेस- सचिन सावंत, अनिरुद्ध वनकर, मुजफ्फर हुसेन, रजनीताई पाटील
हेही वाचा Rohit Shetty meets Amit Shah : दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी घेतली अमित शहा यांची भेट