ETV Bharat / city

Eknath Shinde called Raj Thackeray : एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना केला फोन, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर झाली चर्चा - Eknath Shinde phone raj thackeray

एकनाथ शिंदे ( Eknath Shinde news ) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Eknath Shinde called Raj Thackeray ) यांना दोन वेळा फोन करून त्यांच्याशी या सर्व घडामोडींवर चर्चा केल्याची माहिती समोर आलेली आहे. त्याचबरोबर, त्यांनी राज यांच्या तब्येतीची सुद्धा विचारपूस केल्याचे सांगितले जात आहे.

Eknath Shinde called Raj Thackeray
राज ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी कॉल केला
author img

By

Published : Jun 27, 2022, 10:30 AM IST

मुंबई - एकनाथ शिंदे ( Eknath Shinde news ) यांनी बंडखोरी केल्याने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणामध्ये उलथापालथ होताना दिसत आहे. तर, दुसरीकडे राजकारणाचा हा लढा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन पोहचला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल असताना या घडामोडीमध्ये एक नवीन बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Eknath Shinde called Raj Thackeray ) यांना दोन वेळा फोन करून त्यांच्याशी या सर्व घडामोडींवर चर्चा केल्याची माहिती समोर आलेली आहे. त्याचबरोबर, त्यांनी राज यांच्या तब्येतीची सुद्धा विचारपूस केल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा..संजय राऊत यांचे एका बाणात दोन पक्षी!

लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा - बंडखोर शिंदे गटाच्या १६ आमदारांना एकनाथ शिंदेसह अपात्र ठरवल्या प्रकरणी हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट झालेल आहे. सर्वोच्च न्यायालयात आज याबाबत सुनवाई होणार असून या राजकीय घडामोडीमध्ये आत्ता एकनाथ शिंदे यांनी काल शिवतीर्थावर फोन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर चर्चा केल्याचे बोलले जात आहे. काय सायंकाळी एकनाथ शिंदे यांनी राज यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या. राज ठाकरे व शिंदे यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

हीप बोनची शस्त्रक्रिया झाल्याने सध्या विश्रांती - राज ठाकरे यांना मागील काही काळापासून हिप बोनचा त्रास होता. त्यानंतर ते शस्त्रक्रिया करण्यासाठी गेले असता त्यांना करोनाची लागण झाल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. अखेर काही दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर शनिवारी राज ठाकरे आपल्या घरी परतले. याबाबत, आपल्या आशीर्वादाने, प्रार्थनेने माझी शस्त्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडली. काही वेळापूर्वीच रुग्णालयातून बाहेर पडून मी घरी पोहचलो आहे. आपले आशीर्वाद, प्रेम असेच कायम असू देत, असे राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष? - एकीकडे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदारांचा गट तयार करून नवीन खेळी केली आहे. परंतु, त्यांच्या १६ आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरवल्या कारणाने हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे. आता यापुढे हे १६ आमदार पात्र ठरतात किती अपात्र? तसेच एकनाथ शिंदे यांचे गटनेते पद कायम राहते की नाही? यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघावी लागणार आहे. तर, दुसरीकडे याच्या पुढची रणनीती काय असणार याची चाचपणी एकनाथ शिंदे व त्यांचे समर्थक आमदारांकडून केली जात आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी राज ठाकरे यांना फोन लावला असल्याची माहितीही समोर येत आहे.

राज ठाकरे वेट अँड वॉचच्या भूमिकेत? - या अगोदर छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे यांनी शिवसेनेला रामराम ठोकले होते. परंतु, सध्याच्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बंड करून जवळपास ४० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा त्यांच्यासोबत ठेवला असल्याकारणाने हा पेचप्रसंग कशा पद्धतीने सुटला जाईल किंवा यामध्ये काय करू शकतो याबाबत सुद्धा त्यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, या सर्व प्रकरणांमध्ये सध्या तरी राज ठाकरे यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नसल्याकारणाने राज ठाकरे सुद्धा यावर काय भूमिका घेतात हे बघणे सुद्धा गरजेचे झालेले आहे.

हेही वाचा - Mumbai APMC Market : एपीएमसी मार्केटमध्ये कोथिंबीर, मेथीचे दर वाढले तर वाटण्याचे दर झाले कमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.