मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात 18 मंत्र्यांनी ( Eknath shinde cabinet ) शपथ घेतली. या मंत्रिमंडळात सुरेश खाडे हे सर्वाधिक उच्च शिक्षित असून त्यांनी कोलंबो विद्यापीठातून ( University of Colombo ) डॉक्टरेट पदवी घेतली आहे. तर, एक मंत्री केवळ दहावी पास आहे. एकनाथ शिंदे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तार मध्ये 9 मंत्री एकनाथ शिंदे गटातले तर, इतर नऊ मंत्री भारतीय जनता पक्षातल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या मंत्रीमंडळात सामावून घेतलेल्या 18 मंत्र्यांपैकी किती मंत्री उच्चशिक्षित आहेत? किती मंत्री दहावी पास आहे? त्याबाबत आढावा या रिपोर्टमध्ये आपण घेणार आहोत. नव्या मंत्रिमंडळात मंत्री सुरेश खाडे ( Suresh Khade ) हे सर्वात जास्त उच्चशिक्षित आहेत. तर एका मंत्र्यांचे फक्त दहावी प्रर्यंत शिक्षण झाले आहे. ( Eknath Shinde Cabinet Ministers Education )
राधाकृष्ण विखे पाटील - राधाकृष्ण विखे पाटील यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. अहमदनगरच्या प्रवरा नगर येथून प्रवरा युवक काँग्रेसची स्थापना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. राधाकृष्ण विखे पाटील यांना राजकीय घरण्याची पार्श्वभूमी लाभली आहे. आशिया खंडातील पहिला साखर कारखाना विखे पाटील यांच्या कुटुंबीयांनी सुरू केला होता. 1995 पासून ते सलग आज पर्यंत शिर्डी या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत.
चंद्रकांत पाटील- यांचे शिक्षण पदवीपर्यंत पूर्ण झाले आहे. चंद्रकांत पाटील यांचे शिक्षण मुंबईत पूर्ण झाले असून मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून त्यांनी बीकॉमची पदवी घेतली आहे. मात्र, आपल्या राजकीय कारकीर्द त्यांनी कोल्हापुरातून सुरू केली. 1980 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम त्यांनी सुरू केले होते. तर, युती सरकारमध्ये सहकार, महसूल सार्वजनिक बांधकाम अशी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली आहेत.
गिरीश महाजन- यांचे शिक्षण बारावी पर्यंत झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख राजकीय वर्तुळात आहे. अनेक वेळा पक्षासाठी त्यांनी "संकटमोचक" म्हणून भूमिकाही बजावली. 2014 च्या महायुतीच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा हे महत्त्वाचं खातं मंत्री म्हणून सांभाळे.
सुधीर मुनगंटीवार - यांचे शिक्षण पदव्युत्तरपर्यंत झाले आहे. 1995 पासून चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून सलग आतापर्यंत ते निवडून आले आहेत. 1981 पासून विद्यार्थी संघटनेतून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. 1999 सली असलेले युतीच्या सरकारमध्ये त्यांना पहिल्यांदा मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
गुलाबराव पाटील- यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. गुलाबराव पाटील यांचा राजकीय प्रवास हा त्यांच्या संघर्षमय राहिला. सुरवातीच्या काळात ते पानटपरी चालवायचे. त्यानंतर शिवसेनेतून त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरु केला. 1992 साली पहिल्यांदा ते पंचायत समिती सदस्य झाले. 1999 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते.
उदय सामंत- ऑटोमोबाइल क्षेत्रातील डिप्लोमा केला आहे. 2004 सालापासून आतापर्यंत ते सलग रत्नागिरी मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले आहेत. आधी राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर शिवसेनेतून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द घडवली. 1999 सालापासून युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले.
दादा भुसे- यांचे सिविल इंजीनियरिंग पर्यंतचे शिक्षण झाले आहे. दादा भुसे सुरुवातीला पाटबंधारे विभागामध्ये अभियंता म्हणून काम करत होते. या विभागात त्यांनी पंधरा वर्षे नोकरी केली. त्यानंतर आनंद दिघे यांच्या ते संपर्कात आले. 2004 साली पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक मालेगाव मतदार संघातून लढवली.
दीपक केसरकर- त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते म्हणून दीपक केसरकर यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. सुरुवातीला काँग्रेस पक्षा सोबत त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केल.1992 ला ते काँग्रेसचे तालुका अध्यक्ष होते. मात्र, 2009 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली.
अब्दुल सत्तार- पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 1984 साली अब्दुल सत्तार पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. 1994 साली ते पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले. 2009 साली ते काँग्रेसच्या तिकीटावर पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 2019 च्या विधानसभा निवडणूक आधी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळीही ते निवडून आले होते.
संजय राठोड- यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 2004 साली पहिल्यांदा दिग्रस विधानसभा मतदार संघातून संजय राठोड निवडून आले. यावेळी काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे माणिकराव ठाकरे यांचा त्यांनी पराभव केला. सलग चार वेळा दिग्रस मतदार संघातून ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री असलेल्या संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता.
शंभूराजे देसाई- बारावी पर्यंत शिक्षण केले. 2004 पासून सलग तीन वेळा पाटण मतदार संघातून शंभूराजे देसाई निवडून आले आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांचे नातू म्हणूनही त्यांची ओळख आहेत. त्यांना कन्नडा राजकीय पार्श्वभूमी लाभलेली आहे.
मंगल प्रभात लोधा- एल.एल.बी ची पदवी घेतली. मंगल प्रभात लोढा हे मूळचे राजस्थान मधले असून मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी बांधकाम व्यवसाय म्हणून सुरुवात केली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1995 पासून सलग सहा वेळा ते दक्षिण मुंबई मधील मलबारी मतदारसंघातून निवडून आले आहेत.
रवींद्र चव्हाण- बारावी पर्यंत शिक्षण केले आहे. राज्यात सत्तांतर घडवताना रवींद्र चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. रवींद्र चव्हाण यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. 2005 साली पहिल्यांदा ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये निवडून आले. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली.
संदीपान भुमरे- दहावी पर्यंत शिक्षण घेतले. त्यांचा राजकीय प्रवास हा अत्यंत संघर्षमय राहिला आहे. पैठण येथील संत एकनाथ सहकारी कारखाना येथे स्लीप बॉय म्हणून काम करायचे. मात्र, या काळात 1985 झाली त्यांचा शिवसेना संघटनेशी संपर्क झाला. त्यावेळी पैठण तालुक्यात त्यांनी पहिली शिवसेना शाखा सुरू केली. त्यानंतर 1995 साली पैठण मतदार संघातून ते आमदार म्हणून निवडून आले. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदही भूषवलं आहे.
विजयकुमार गावित - यांनी डॉक्टर पदवी घेतली आहे. यांनी चौथ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली. आधी अपक्ष त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता भारतीय जनता पक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. 1995 चाली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडणुका लढवली.
तानाजी सावंत - यांचे पदव्युत्तरपर्यंत शिक्षण झाले आहे. शिवसेनेत बंड पुकारणाऱ्या नेत्यांपैकी प्रमुख म्हणून तानाजी सावंत सर्वात पुढे होते. इलेक्ट्रिक इंजिनिअर असलेले तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आपली राजकीय कारकीर्द सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करत 2016 साली विधान परिषदेवर आमदार म्हणून गेले.
अतुल सावे - यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. तरुण वयापासूनच भारतीय जनता पक्षातून त्यांनी आपले राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. तत्कालीन देवेंद्र फडणीस सरकारमध्ये केवळ पाच महिने ते मंत्री म्हणून कार्यरत राहिले. भारतीय जनता पक्षाची संघटना वाढीसाठी त्यांचा अत्यंत मोलाचे योगदान राहिले.
सुरेश खाडे- हे नव्या मंत्रिमंडळात सर्वाधिक उच्च शिक्षित असून त्यांनी कोलंबो विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी घेतली आहे. 2004 मध्ये पहिल्यांदा ते विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर मिरज मतदार संघातून आजतागायत सलग निवडून येत आहेत. राहुरी कृषी विद्यापीठाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.
हेही वाचा - Nitish Kumar : '2014 मध्ये जिंकलात, 2024 ची काळजी...'; शपथ घेतल्यानंतर नितीश कुमारांचा पंतप्रधानांवर निशाणा