मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे ( Eknath Khadse meet governor ) यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन ( Governor Bhagatsingh Koshyari ) येथे भेट घेतली. ही जरी सदिच्छा भेट असली तरी या भेटीदरम्यान सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली असल्याचे समजत आहे.
राज्यात झालेल्या नाट्यमय सत्तांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान सध्याच्या राजकीय परिस्थितीवर एकनाथ खडसे यांनी राज्यपालांशी चर्चा केल्याची माहिती समोर ( Eknath Khadse discussion with governor ) आली आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीमध्ये एकनाथ खडसे यांचे होतं. परंतु सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ( Anjali Damania ) यांनी एकनाथ खडसे यांच्या नावाला विरोध केला होता. त्याचबरोबर १२ आमदारांची नियुक्ती बऱ्याच वर्षापासून रखडली होती. परंतु विधानसभेतून विधानपरिषदेवर निवडून येणाऱ्या आमदारांमध्ये एकनाथ खडसे यांची वर्णी लागल्याने आता ते परिषदेचे आमदार झाले आहेत.
भाजपमध्ये होत होती घुसमट?- एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. मागील चार दशक ते भाजप सोबत होते व भाजप सोबत असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी खटके उडाले होते. त्याचबरोबर त्यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारल्याने ते नाराज होऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. एकनाथ खडसेंना राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. परंतु एकनाथ खडसे यांच्या नावाला भाजपकडूनच विरोध करण्यात आला होता.
हेही वाचा-टायमिंग बघा, सर्व टायमिंगचा खेळ.. भावना गवळींच्या सहकाऱ्याला जामीन मिळाल्यावर राऊतांचा ईडीवर निशाणा
हेही वाचाCM Eknath Shinde - महाविकास आघाडी सरकार सोडण्यामागे अनेक कारणे होती - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे