ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाचे 831 नवे रुग्ण.. 5,868 रुग्णांना डिस्चार्ज, 23 रुग्णांचा मृत्यू - मुंबई कोरोना अपडेट

मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज 831 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

new corona positive patient found in mumbai

author img

By

Published : Jun 1, 2021, 9:13 PM IST

मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. रविवारी 1 हजार 66 नवे रुग्ण आढळून आले होते. सोमवारी घट होऊन 676 रुग्ण आढळून आले होते. आज पुन्हा किंचित वाढ होऊन 831 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज 23 रुग्णांचा मृत्यू झाला 5868 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 453 दिवस -

मुंबईत आज 831 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 7 हजार 82 वर पोहचला आहे. आज 23 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 14 हजार 907 वर पोहचला आहे. 5 हजार 868 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 72 हजार 664 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 17 हजार 328 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 453 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 35 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 153 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 23 हजार 503 तर आतापर्यंत एकूण 62 लाख 95 हजार 246 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

रुग्ण संख्येत चढ उतार सुरूच -

1 मे ला 3908, 2 मे ला 3672, 3 मे ला 2662, 4 मे ला 2554, 5 मे ला 3879, 6 मे ला 3056, 7 मे ला 3039, 8 मे ला 2678, 9 मे ला 2403, 10 मे ला 1794, 11 मे ला 1717, 12 मे ला 2116, 13 मे ला 1946, 14 मे ला 1657, 15 मे ला 1447, 16 मे ला 1544, 17 मे ला 1240, 18 मे ला 953, 19 मे ला 1350, 20 मे ला 1425, 21 मे ला 1416, 22 मे ला 1299, 23 मे ला 1431, 24 मे ला 1057, 25 मे ला 1037, 26 मे ला 1362, 27 मे ला 1266, 28 मे ला 929, 29 मे ला 1048, 30 मे ला 1066, 31 मे ला 676, 1 जून ला 831 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.