मुंबई - बारावी बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला असल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षा काळात हा प्रकार घडल्याने परिक्षा व्यवस्थेसर शिक्षण मंत्र्यांवर प्रश्नचिन्न उपस्थित केले जात आहे. (Chemistry question paper leak) यामध्ये विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली आहे. मुकेश यादव असे या खाजगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.
परीक्षेच्या आधीच पेपर फुटल्याने एकच गोंधळ
या शिक्षकाने केमिस्ट्रीचा पेपर आपल्या कोचिंग क्लासेसच्या तीन विद्यार्थ्यांना व्ह्ट्सअपवर पेपर सुरू होण्याआधीच दिला होता. शिनिवारी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास केमिस्ट्रीचा पेपर सुरू होणार होता. (12 th Chemistry question paper leak) मात्र, परीक्षेच्या आधीच पेपर फुटल्याने एकच गोंधळ झाला आहे. दरम्यान, आता या सर्व घटनेवर शालेय मिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बारावीचा केमिस्ट्री विषयाचा पेपर फुटलाच नाही असा दावा त्यांनी केला आहे.
विधान परिषदेत निवेदन सादर
प्रश्नपत्रिकेचे वाटप झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचा काही भाग हॉट्सअपच्या माध्यमातून एका विद्यार्थीनीच्या मोबाईलवर आढळून आला आहे. असल्याचे गायकवाड यांनी यावेळी सांगितले. विधान परिषदेत निवेदन सादर करत असताना त्यांनी ही माहिती दिली.
हा संपुर्ण पेफर फुटला असे म्हणात येणार नाही
नियमानुसार सकाळी 10:30 वाजता प्रश्नपत्रिकेचे वाटप झाले होते. विलेपार्ले येथील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीला उशीर झाला होता. तेव्हा तिचा फोन तपासला असता प्रश्नपत्रिकेचा काही भाग मोबाईलमध्ये आढळून आला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे हा संपुर्ण पेफर फुटला असे म्हणात येणार नाही असही त्या म्हणाल्या आहेत.
हेही वाचा - बारावीचा पेपर फुटला; रसायनशास्त्राचा पेपर व्हाट्सअॅपवर व्हायरल; मलाडच्या कोचिंग क्लास शिक्षकाला अटक