ETV Bharat / city

११ जानेवारीला चौकशीला हजर राहण्याचे ईडीचे वर्षा राऊत यांना समन्स - pratap sainaik news

11 जानेवारी रोजी त्यांना ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पुन्हा एकदा पाठवण्यात आले आहे. याअगोदर 5 जानेवारी रोजी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते, मात्र त्या एक दिवस आधी 4 जानेवारी रोजी ईडी कार्यालयांमध्ये चौकशीसाठी हजर झाल्या.

ED
ED
author img

By

Published : Jan 6, 2021, 3:25 PM IST

मुंबई - पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी तपास करत असलेल्या ईडीकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलेल आहे. 11 जानेवारी रोजी त्यांना ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पुन्हा एकदा पाठवण्यात आले आहे. याअगोदर 5 जानेवारी रोजी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते, मात्र त्या एक दिवस आधी 4 जानेवारी रोजी ईडी कार्यालयांमध्ये चौकशीसाठी हजर झाल्या.

वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात आले 55 लाख

वर्षा राऊत यांच्या बँक खात्यामध्ये खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या माध्यमातून 55 लाख रुपये बिनव्याजी देण्यात आले होते. डिसेंबर 2010मध्ये 50 लाख व 2011मध्ये पाच लाख असे दोन टप्प्यात 55 लाख रुपये वर्षा राऊत यांना मिळाले असल्यामुळे याचा वापर त्यांनी दादर पूर्व येथील फ्लॅट विकत घेण्यासाठी केला होता. दरम्यान, खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे प्रवीण राऊत यांना पीएमसी बँकेकडून 95 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. यासाठी कुठल्याही प्रकारची योग्य कागदपत्रे सादर करण्यात न आल्याचे तपासात आढळून आले आहे.

आमदार प्रताप सरनाईक ईडी चौकशीला गैरहजर

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना पुन्हा एकदा ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलेले होते. 6 जानेवारी रोजी आमदार प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी हजर राहणे गरजेचे होते. मात्र वैयक्तिक कारणांमुळे चौकशीला हजर राहू शकत नसल्याचे सरनाईक यांनी त्यांच्या वकिलांमार्फत अधिकाऱ्यांना कळवले आहे. आता यापुढे जाऊन नव्याने समन्स त्यांना ईडी बजावणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.