मुंबई - 'जेट एअरवेज' या विमान कंपनीचे मालक नरेश गोयल यांच्या मुंबई आणि दिल्लीतील घरांवर ईडीचा छापा पडला आहे. परकीय चलन विनिमय अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्यासंबंधी अतिरिक्त पुरावे गोळा करण्यासाठी ईडीने हा छापा मारला आहे.
१७ एप्रिल रोजी जेट एअरवेज कंपनी बंद पडली होती.
या छाप्यांमध्ये स्थावर मालमत्तेची कागदपत्रे, २ आलिशान गाड्या आणि चलनातून बाद केलेले पाच लाख रूपये जप्त करण्यात आले. यासोबतच, डिजिटल स्वरुपातील पुरावे देखील जप्त करण्यात आले आहेत. या पुराव्यांचे विश्लेषण सुरु आहे.