ETV Bharat / city

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण : ईडीने माजी आमदार विवेक पाटील यांच्याविरोधात दाखल केले आरोपपत्र

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात सीआयडीच्या उपअधिक्षक सरोदे यांनी विवेक पाटलांसह, अभिजित पाटील यांची वाहने जप्त करण्याची कारवाई केली होती. ईडीच्या माध्यमातून विरुद्ध विवेकानंद यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आल आहे. सद्यस्थितीत त्यांना तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

माजी आमदार विवेक पाटील
माजी आमदार विवेक पाटील
author img

By

Published : Aug 13, 2021, 9:41 PM IST

नवी मुंबई - कर्नाळा बँकेच्या ५२९ कोटीच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांना आर्थिक घोटाळाप्रकरणी राहत्या घरातून 15 जून ला ईडीच्या माध्यमातून अटक करण्यात आली होती. आता विवेक पाटील यांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. ईडीच्या माध्यमातून विवेकानंद यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सद्यस्थितीत त्यांना तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

१५ जूनला राहत्या घरातून विवेक पाटील यांना अटक -

कर्नाळा बँकेच्या ५२९ कोटीच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांना १५ जूनला मुंबई ईडी झोन-२ चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी निवासस्थानावरून अटक केली होती. राज्य शासनाचे गृहखाते अटकेची कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने चार महिन्यांपूर्वी पनवेल संघर्ष समितीने ईडीचे मुख्य विशेष संचालक सुशिल कुमार यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्यानुसार अखेर १५ जूनला अटक झाली होती.

ऑडीट रिपोर्टमध्ये गैरव्यवहार दडपण्यात आले -

पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बॅकेच्या ५२९ कोटीच्या घोटाळ्याला माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह त्यांचे अनेक संचालक मंडळातील सहकारी जबाबदार आहेत. ५० हजार ६८९ ठेविदारांच्या ५२९ कोटीच्या ठेवी बँकेत होत्या. बँकेच्या सुरूवातीपासून तत्कालीन शेकाप नेत्यांनी स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी बँकेतून गैरमार्गाने कोट्यवधी रूपयांच्या ठेवी उचलून बॅकेत गैरव्यवहार केला होता. मात्र, ऑडिट रिपोर्टमध्ये सर्व गैरव्यवहार दडपण्यात आले होते. कर्नाळा बँकेच्या प्रारंभापासूनच्या व्यवहाराची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून करण्यात आली होती व या गुन्ह्याचा तपास ईडीचे झोन-२ चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांच्याकडे सोपविला होता.

रिझर्व्ह बँकेला कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या व्यवहारात आला अनियमितपणा निदर्शनास -

रिझर्व्ह बँकेला कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या व्यवहारात अनियमितपणा निदर्शनास आल्याने त्यांनी सहकार आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी तातडीने रायगड जिल्हा विशेष लेखा परिक्षक यु. जी. तुपे यांची नियुक्ती करून पूर्नतपासणी केल्यानंतर ६३ कर्ज खात्याद्वारे ५१२ कोटीचा घोटाळा उघड झाला होता. त्यानंतर चौकशीत तो आकडा ५२९ कोटींवर गेला आहे.

सीआयडीच्या माध्यमातून वाहने जप्त -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.