मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉड्रिंग प्रकरणात 23 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. कुर्ला येथील गोरावाला जमीन खरेदी मध्ये मनी लँडिंगच्या आरोपाखाली अटक झाल्यापासून नवाब मलिक यांच्या अडचणीत कमी होताना दिसत नाही आहे. ईडीने नवाब मलिक यांच्यासह कुटुंबीयांची मालमत्ते संदर्भातील माहिती जिल्हा निबंधकांकडून मागितली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तपासासाठी माहिती मागवली - मनी लॉड्रिंग प्रतिबंध कायदा 2002 च्या तरतुदींनुसार मलिक यांच्या विरोधात सुरू असलेल्या तपासाचा एक भाग म्हणून ही माहिती मागवली आहे. ईडीने 24 मार्च रोजी एका पत्राद्वारे सह जिल्हा निबंधक मुंबई उपनगर यांच्याकडे कुर्ला, वांद्रे आणि मलिक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असलेल्या विविध मालमत्तांच्या तपशिलांसह कागदपत्रे प्रदान करण्यासाठी माहिती मागवली आहे. नवाब मलिक सध्या पीएमएलए कायद्यान्वये अटकेत आहे. ईडीने संयुक्त जिल्हा निबंधकांना प्रती दस्तऐवज आणि विभागाद्वारे राखलेले इतर रेकॉर्ड प्रदान करण्याचे आवाहन केले आहे. ज्यामध्ये दस्तऐवज उक्त मालमत्तेची मालकी दर्शवते. संबंधित मालमत्ता मलिक, त्याची पत्नी मेहजबीन आणि मुलगा फराज यांच्या नावावर असल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीने सांताक्रूझ पश्चिम येथील फ्लॅट क्रमांक 6, गुलामनबी मनील आणि फ्लॅट क्रमांक 501, वांद्रे वास्तू, वांद्रे पश्चिम येथील मलिक यांचा मुलगा फराज यांच्या मालकीचा तपशील मागवला आहे.
प्लॅट्सचा तपशील मागवला - ईडीला मलिकच्या पत्नी मेहजबीनच्या नावावर कुर्ला पश्चिमेकडील नूर मंझील येथील फ्लॅट क्रमांक B-03, C-2, C-12 आणि G-8 बद्दल तपशील देखील हवा होता. ही माहिती प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा 2002 च्या कलम 50 अन्वये मागविण्यात आली आहे. मलिक आणि अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना परमार यांचा समावेश असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या आठवड्यात मुंबईच्या उपनगरातील कुर्ला येथील गोरावाला कंपाऊंडचे सर्वेक्षण केल्यानंतर ईडीचे पत्र आले आहे. कंपाऊंडमध्ये राहणारे मूळ भाडेकरू आणि पारकर यांच्याकडून जमीन खरेदी केल्यानंतर मलिक यांनी ओळख करून दिलेल्या भाडेकरूंची ओळख तपासण्यासाठी ईडीने या भागाचे सर्वेक्षण केले होते. जमिनीचे रजिस्ट्री मूल्य कमी करण्यासाठी मलिकांनी बनावट भाडेकरू आणल्याचा आरोपही ईडीने केला आहे.
मलिकांच्या अडचणीत वाढ - मागील आठवड्यात अधिकाऱ्याने कुर्ला येथील गोरावाला कंपाऊंडमध्ये जाऊन 4 तास चौकशी केली होती. तेथील एका सीनियर सिटीजन व्यक्तीने ईडीला नवाब मलिक यांच्या संदर्भात काही माहिती दिल्यानंतर ईडीने त्या व्यक्ती सोबत कुर्ला येथील गोरावाला कंपाऊंडमध्ये जाऊन तेथील लोकांचे तपास देखील केला होता. ईडीच्या 2 टीम कुर्ला येथील कंपाऊंडमध्ये जाऊन चौकशी केली होती. त्यानंतर आताही ईडीने नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची संपत्तीबाबत जिल्हा निबंधक कार्यालयाकडे माहिती विचारल्याने नवाब मलिक यांच्या अडचणी वाढल्या आहेत.