मुंबई - राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) हे अडचणीत आले आहेत. आज बुधवार (दि. 23 फेब्रुवारी)रोजी सकाळपासून मलिक यांची चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मालमत्त्येच्या व्यवहारांबाबत भाजपने पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर आरोप केले होते. (ED action against Nawab Malik) दरम्यान, मलिक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने ईडी कार्यालयासमोर जमा झाले आहेत. तुम आगे बढो हम तुम्हारे साथे है अशा घोषणांनी ईडी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला आहे. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडून नये म्हणून येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात कार्यकर्ते मोठ्यामोठ्याने घोषणा देत आहेत - राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ आणि ईडीच्या विरोधात ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले आहे. त्यासाठी दुपारी 12 वाजल्यापासून मोठ्या संख्येने कार्यकर्ते येथे एकत्र झाले आहेत. दरम्यान, ईडी विरोधात, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात कार्यकर्ते मोठ्यामोठ्याने घोषणा देत आहेत. तसेच, मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने जमल्या आहेत.
भाजप नेत्यांच्या विरोधात असलेल्या तक्रारींचे काय झाले? - नवाब मलिक जेव्हा एनसीबीच्या विरोधात बोलत होते त्यावेळीच नवाब मलिक यांनी एक ट्विट केले होते की, माझ्या घरी काही सरकारी पाहुणे येणार आहेत. आज त्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. पाहुण्यांचा पाहुणचार कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. असही ते म्हणाले होते. भाजप नेत्यांच्या विरोधात असलेल्या तक्रारींचे काय झाले. नारायण राणे, विजयकुमार गावित, कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात झालेल्या तक्रारींचे काय झाले हा प्रश्नही आम्ही विचारणार आहोत असेही राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे.
काय आहे हे प्रकरण, जाणून घ्या - 1993 च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात गुन्हेगार असणारे सरदार शहावली खान आणि सलीम पटेल या दोघांकडून नवाब मलिक यांनी कुर्ल्यातील जमीन खरेदी केली होती. कुर्ल्यात मोक्याच्या परिसरामध्ये ही तीन एकर जागा असल्याचे फडणीसांनी सांगितले होते. 2005 मध्ये या ठिकाणी दोन हजार रुपये स्क्वेअर फुटच्यावर भाव असताना केवळ पंचवीस रुपये स्केअर फुट किमतीवर ही जमीन खरेदी कशी केली? असा प्रश्न पत्रकार परिषदेतून देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. मात्र, या जमीन खरेदीत कोणताही गैरव्यवहार झाला नसून देवेंद्र फडणवीस सांगत असलेल्या तीन एकर जागा आपण खरेदी केली नाही. त्या जागेवरील काही भाग कायदेशीर रित्या खरेदी केला असल्याचे स्पष्टीकरण नवाब मलिक यांच्याकडून पत्रकार परिषदेत देण्यात आले आहे.
हेही वाचा - Sharad Pawar on Nawab Malik : 'सरकार विरोधात जाहीर भूमिका मांडणाऱ्यांना त्रास दिला जातोय'