मुंबई - शिवसेनेला दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे सत्ता वाचवण्यासाठी शिवसेनेकडून सुरू असलेले प्रयत्न तर दुसरीकडे अतिशय विश्वासाचे असलेले परिवहन मंत्री अनिल परब यांची आज ( मंगळवारी ) ईडीकडून तब्बल 10 तासांपेक्षा ( 10 hours ED interrogates Anil Parab ) अधिक काळ चौकशी केली आहे. अनिल परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दापोली रिसॉर्ट प्रकरणात ( Dapoli Resort Case ) ईडीने अनिल परब यांना समन्स बजावले होते. त्यानंतर आज सकाळपासून ईडी कार्यालयात परब यांची चौकशी सुरू असून परब यांच्या समर्थनार्थ ईडी कार्यालयाबाहेर शिवसेनेचे कार्यकर्तेही जमण्यास सुरुवात झाले आहे. अनिल परब यांना 15 जून रोजी ईडीने नोटीस बजावली होती.
अनिल परब साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यामुळे आपण चौकसीसाठी ईडी कार्यालयात जाऊ शकलो नव्हतो, असे परब यांनी सांगितले होते. भाजपाचे किरीट सोमैया यांनी परब यांच्यावर मनी लॉड्रिंगचा आरोप करत काही पुरावे ईडी कार्यालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानावर आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरी ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर आता परब यांना चौकशीसाठी हजर झाले आहेत.
काय आहे प्रकरण ? : अनिल परब यांनी 2017 मध्ये दापोली येथे एक प्लॉट खरेदी केला होता. प्लॉटच्या नोंदणीनंतर परब यांनी 2020 मध्ये मुंबईतील केबल ऑपरेटर सदानंद कदम यांना ही जमीन 1.10 कोटी रुपयांना विकली. यामध्ये अनेक प्रकारची फसवणूक झाल्याचा आरोप परब यांच्यावर करण्यात आला आहे. यादरम्यान या भूखंडावर रिसॉर्ट बांधण्यात आले. त्याच्या बांधकामासाठी 6 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी भाजपा नेते किरीट सोमैयांनी काही पुरावे ईडी कार्यालयात सादर केले होते. तसेच अनिल परब यांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा, असे म्हटले होते.
हेही वाचा - Chandrakant Patil On Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर भाजपचे वेट अँड वाॅच - चंद्रकांत पाटील