ETV Bharat / city

Diwali Celebration : तब्बल सहा तास जळणारी पर्यावरण पुरक जादूची पणती

दिवाळी (Diwali Celebration) हा एक प्रमुख हिंदू सण आहे. असा पवित्र हिंदु सण जो वाईटावर चांगल्‍याच्‍या विजयाचे प्रतिक आहे. या सणाला घरात व घराबाहेर मातीच्या पणत्या (ecofriendly magic candle that burns for six hours) लावल्या जातात. दीपोत्सवाला रोषणाईसाठी वापरण्यात येणाऱ्या मातीच्या पणत्यांना जास्त महत्व असते.magic lamp. what is in this candle.

author img

By

Published : Oct 15, 2022, 5:25 PM IST

Updated : Oct 15, 2022, 5:46 PM IST

Diwali Celebration
जादूचा दिवा

नवी मुंबई : दिवाळी किंवा दीपावली (Diwali Celebration) म्हणटलं की उत्साहाचा, आनंदाचा आणि दिव्यांच्या लख्ख प्रकाशाचा सण होय. हा सण प्रत्येक जण आपआपल्या परिने साजरा करतात. मात्र, या सगळ्यांमध्ये पणती लावण्याची प्रथा सर्वत्र सारखी असते. हा दीपोत्सव भारतातच नाही, तर विदेशातही आपले लोक साजरा करतात. मुंबई येथे अश्याच पर्यावरण पुरक पणत्या (ecofriendly magic candle that burns for six hours) तयार केल्या जात आहे. आणि त्यांचे वैशिष्टय (what is in this candle) बघुन त्यांना जादुचा दिवा (magic lamp) असे नाव देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया देतांना दत्ता शिंगणे

पर्यावरण पूरक पणत्या : मागील वीस वर्षांपासून पनवेल मधील युसूफ मेहेरअली सेंटरमध्ये पर्यावरण पूरक पणत्या बनवल्या जातात. यावर्षी देखील दिवाळीसाठी खास पणत्यांची निर्मिती करण्यात आली आहे. बेळगाव, कर्नाटक मधून येणाऱ्या टेराकोटा मातीपासून या पणत्या तयार करण्यात आल्या आहेत. पूर्ण अस्सल मातीच्या पणत्यांमुळे पर्यावरणाची कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. विशेष म्हणजे या पणत्यांना जादूचा दिवा असे नाव देण्यात आले आहे.

प्रचंड मागणी : या पर्यावरण पूरक जादूच्या दिव्याला वरून नाही तर खालून तेल घालायचे असते आणि एकदा तेल घातले तर, तब्बल सहा तास हा दिवा जळत रहातो. आदिवासी मुलांनी तयार केलेल्या या दिव्यांच्या विक्रीतून जो नफा मिळतो, तो नफा आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्यात येतो. आकर्षक आणि परवडणाऱ्या या दिव्यांना मुंबईसह राज्याच्या अनेक ठिकाणाहून मोठी मागणी आहे.

सजावटीसाठी डिझाईनच्या पणत्या : आत्ता पर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मातीपासुन, तसेच काच व प्लास्टीक पासुनही तयार केलेल्या पणत्या बघितल्या आहेत. मात्र, टेराकोटा मातीपासून तयार केलेल्या सुंदर व आकर्षक अश्या पणत्या आणि तेही तब्बल सहा तास जळत राहणाऱ्या, म्हणजेच तयार करणाऱ्यांची कमालचं आहे. दीपोत्सव भारतातच नाही, तर विदेशातही आपले लोक साजरा करतात. त्यामुळे भारताप्रमाणेच भारताबाहेरही पणत्यांना कमालीची मागणी आहे. आता तर लोक अनेक उत्सवांमध्ये व कार्यक्रमांमध्ये देखील सजावटी साठी डिझाईनच्या पणत्या वापरतात.

Last Updated : Oct 15, 2022, 5:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.