ETV Bharat / city

Dussehra Gathering Shivaji Park : शिवाजी पार्कवर शिवसेनेचा तर, बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा? - Shinde group at BKC Maidan

शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा Dussehra gathering at Shivaji Park घेण्यावरुन जुंपली होती. अखेर शिंदे गटाने माघार घेत, बीकेसी मैदानावर Shinde Group Dussehra Gathering at BKC Grounds दसरा मेळावा घेण्यासाठी अर्ज दाखल केला असून शिवाजी पार्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray यांच्यासाठी सोडल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Dussehra Gathering
शिंदे गटाचा दसरा मेळावा
author img

By

Published : Sep 13, 2022, 11:58 AM IST

Updated : Sep 13, 2022, 12:38 PM IST

मुंबई - शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा Dussehra gathering at Shivaji Park घेण्यावरुन जुंपली होती. अखेर शिंदे गटाने माघार घेत, बीकेसी मैदानावर Shinde Group Dussehra Gathering at BKC Grounds दसरा मेळावा घेण्यासाठी अर्ज दाखल केला असून शिवाजी पार्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray यांच्यासाठी सोडल्याची माहिती सुत्रांनी दिली. शिवाजी पार्कचा निर्णय मात्र पालिका आयुक्तांच्या अख्यारित आहे, ते काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्वाचे आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर - कोविड कालावधी वगळता दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर Shivaji Park घेण्यात येतो. यंदा शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर मेळाव्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर, शिंदे गटानेही शिवाजी पार्कवर दावा ठोकला होता. शिवसेना, शिंदे गटात सध्या जोरदार शाब्दीक युद्ध सुरू आहे. दसरा मेळाव्यासाठी अवघे बारा दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी बंडखोर गटाचा दसरा मेळावा कुठे, कसा घ्यायचा याविषयी निर्णय घेण्यासाठी आज मुंबईत बैठकीचे आयोजन केले आहे. चर्चगेट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान Yashwantrao Chavan Foundation समोरील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वास्तूत ही बैठक होणार आहे. संध्याकाळी सात वाजता बैठकीला सुरुवात होईल. मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलावलेल्या या बैठकीला सर्व मंत्री, आमदार, नेते, उपनेते आणि युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बीकेसीवर मेळावा घेण्याबाबत चर्चा - शिवसेनेने शिवाजी पार्कवर तर, शिंदे गटाकडून बीकेसीतल्या जागेसाठी अर्ज केला आहे. मुंबई महापालिकेने दोन्ही गटाच्या अर्जाची छाननी सुरु आहे. मुंबई महापालिका आयुक्तांना यासंदर्भातील अहवाल पाठवला जाईल. त्यानंतर आयुक्त निर्णय जाहीर करणार आहेत. दरम्यान, काहींनी शिवसेना पक्षप्रमुखांना शिवाजी पार्क मैदानावर मेळावा घेऊ दे, असे सूर लावले आहेत. त्यामुळे बैठकीत दादर ऐवजी बीकेसीवर मेळावा घेण्याबाबत चर्चा केली जाणार असल्याचे समजते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गट शिवाजी पार्क उद्धव ठाकरे यांना सभा घेण्यास सोडण्यास तयार आहे. मुख्यमंत्री शिंदेंकडून देखील मूक संमती असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. शिवाजी पार्कवरील नियम, कायद्याच्या चौकटीत राहून सभा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आल्याचे समजते. महापालिका आयुक्त याबाबत कोणती भूमिका घेतात, हे लवकरच स्पष्ट होईल.

Last Updated : Sep 13, 2022, 12:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.