मुंबई - यवतमाळ विधान परिषदेसाठी सोमवार (ता. 14) उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. शिवसेनेकडून या जागेसाठी नागपूर येथील काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत चतुर्वेदी हे अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी अकरा वाजता ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
हेही वाचा... 'मला दोन चाकी चालवायची सवय नाही, पण सध्या तीन चाकी चालवतोय'
दुष्यंत चतुर्वेदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, महाविकास आघाडीचे मंत्री नितीन राऊत, अनिल देशमुख, शिवसेना खासदार भावना गवळी, मंत्री संजय राठोड आदी नेते उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा... आज के शिवाजी.. तर शिवरायांच्या वंशजांनी पदांचे राजीनामे द्यावेत
आमदार तानाजी सावंत यांच्या रिक्त झालेल्या जागेवर शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी हे उमेदवार म्हणून निश्चित झाले आहेत. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे ते सुपुत्र आहेत. चतुर्वेदी हे आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेचे कोअर सदस्य असल्याचे सांगितले जात आहे.