ETV Bharat / city

कोरोनामुळे राणीबागेत येणारे पर्यटक घटले - कोरोना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० महिने बंद असलेले भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय १५ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु झाले असले तरी कोरोनाच्या दहशतीमुळे पर्यटकांची संख्या घटली आहे. रोज सहा हजारावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या महिनाभरात सुमारे १ लाखावर पोहोचली आहे.

कोरोनामुळे राणीच्या बागेच्या महसुलात घट
कोरोनामुळे राणीच्या बागेच्या महसुलात घट
author img

By

Published : Apr 1, 2021, 12:10 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० महिने बंद असलेले भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय १५ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु झाले असले तरी कोरोनाच्या दहशतीमुळे पर्यटकांची संख्या घटली आहे. रोज सहा हजारावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या आता १५ फेब्रुवारी ते १५ मार्च या महिनाभरात सुमारे १ लाखावर पोहोचली आले. शनिवारी, रविवार या सुट्टीच्या दिवशी साधारण १२ हजार पर्यटक येत असे. गेल्या शनिवार, रविवारी ही संख्या अडीच ते तीन हजारावर आली आहे. त्यामुळे राणीबागेच्या महसूलालाही कोरोनाचा चांगलाच फटका बसला असून महिन्याला अवघा ४० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.

कोरोनामुळे राणीबाग बंद
मागील वर्षी मार्च महिन्यांत मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने राणीबागही बंद करावे लागले होते. लॉकडाऊननंतर सर्वच क्षेत्राला फटका बसला. रोजचे व्यवहार ठप्प झाले. अत्यावश्यक सेवा वगळता लोकल, रस्त्यावरील वाहतूक, ह़ॉटेल तसेच जवळपास छोटे, मोठे व्यवसायही बंद करण्यात आले.यात पर्य़टकांना आकर्षित करणारे भायखळा येथील राणीबागही बंद करावे लागले.

१० महिन्यांनी राणीबाग उघडली
कोरोनाच्या रुग्णांवर नियंत्रण आल्यानंतर ऑगस्ट २०२० नंतर अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्याने तब्बल १० महिन्यांनंतर म्हणजे १५ फेब्रुवारी २०२१ रोजी राणीबाग पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. मात्र यानंतर आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. सध्या रोज चार ते सहा हजारावर रुग्णांची नोंद होत असल्याने मुंबईकरांमध्ये चिंता वाढली आहे. त्यामुळे कोरोनाच्या दहशतीमुळे राणीबागेत येणाऱ्या पर्यटकांची संख्याही घटली आहे.

हेही वाचा - रश्मी ठाकरेंच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी मोदींचा उध्दव ठाकरेंना फोन

महसूल झाला कमी
राणी बागेत पेंग्विन आणल्यापासून पर्यटकांची संख्या वाढली होती. रोज १५ ते २० हजारांपर्यंत मिळणारे उत्पन्न आता एक ते सहा लाख रुपयापर्यंत गेले आहे.यात सरासरी उत्पन्न प्रतिदिवस दीड लाख आणि महिना सरासरी ४५ लाख रुपयांवर गेले होते. मात्र, कोरोनामुळे मागील दहा महिन्यांपासून राणीबाग बंद असल्याने रोज दीड लाखांचा महसूल बुडत होता. १५ फेब्रुवारी २०२१ पासून राणीबाग सुरु झाल्यानंतरही पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने पर्यटकांची संख्या कमी झाली.१५ फेब्रुवारी ते १५ मार्च या एक महिन्याच्या कालावधीत १ लाख पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली. त्यामुळे उत्पन्नही ४० लाखावर आले. पूर्वी रोज पाच ते सहा हजार पर्यटक राणीबागेत येत होते. सध्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पर्यटकांची संख्या आणखी घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोनाचा फटका बसल्याने राणीबाग प्रशासनाच्या रोजचा महसूल बुडतो आहे.

हेही वाचा - आता केवळ 500 रुपयांत होणार कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी
राणी बाग ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच खुली ठेवण्यात येते. यामध्ये प्राणी-पक्षांच्या पिंजर्‍यांजवळ, तिकीट खिडकीजवळ सुरक्षित अंतराचे मार्किंग करण्यात आले आहे. तर ठिकठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. शिवाय प्राण्यांचे पिंजरे पारदर्शक काचांचे असल्यामुळे प्राण्यांची आणि पर्यटकांची सुरक्षितता जपली जाणार आहे, अशी माहिती राणी बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

गर्दी झाल्यास गेट बंद करणार
कोरोनाचा धोका कायम असल्याने राणी बागेत गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाणार आहे. सध्या दिवसभरात केवळ पाच ते सहा हजार पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. मात्र यापेक्षा गर्दी झाल्यास गेट बंद करून प्रवेश नाकारला जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.