ETV Bharat / city

Marathi Artists Political Controversy : 'या' कलाकारांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वादंग; वाचा, सविस्तर...

केतकी चितळेवर ( Ketaki Chitale controversy ) ठाणे, नवी मुंबई, नाशिक सह राज्यात काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. या वादग्रस्त पोस्टमुळे केतकी चितळे हिला अटक झाली असून कोर्टामध्ये याबाबत खटला सुरू आहे. मात्र केतकी चितळेच्या आधीही काही मराठी कलाकारांनी वादग्रस्त पोस्ट किंवा वक्तव्य ( Controversial posts and statements by Marathi artists ) करत राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली होती. वादग्रस्त पोस्ट किंवा वक्तव्यामुळे विविध कलाकारांनीही अडचणींना सामोरे जावे लागले होते.

Marathi Artists Political Controversy
Marathi Artists Political Controversy
author img

By

Published : May 19, 2022, 7:41 PM IST

मुंबई - अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या बाबत वादग्रस्त पोस्ट केली. या पोस्टमुळे राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. मात्र या आधीही काही अभिनेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर गोंधळ निर्माण झाला होता. यासोबतच केतकी चितळेवर ( Ketaki Chitale controversy ) ठाणे, नवी मुंबई, नाशिक सह राज्यात काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. या वादग्रस्त पोस्टमुळे केतकी चितळे हिला अटक झाली असून कोर्टामध्ये याबाबत खटला सुरू आहे. मात्र केतकी चितळेच्या आधीही काही मराठी कलाकारांनी वादग्रस्त पोस्ट किंवा वक्तव्य ( Controversial posts and statements by Marathi artists ) करत राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली होती. वादग्रस्त पोस्ट किंवा वक्तव्यामुळे विविध कलाकारांनीही अडचणींना सामोरे जावे लागले होते.

अभिनेते विक्रम गोखले : अभिनेत्री कंगना रणौतने भारताला 1947 साली मिळालेले स्वतंत्र हे भीक होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. कंगनाच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात नाही तर देशभरात संतापाची लाट उसळली होती. मात्र पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यात समर्थन मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी देखील केले. त्यानंतर राज्यभरातून आणि देशभरातून विक्रम गोखले यांच्या विरोधातही संतापाची लाट उसळली होती. यानंतर या वक्तव्याबाबत विक्रम गोखले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरणही दिले होते.

अभिनेते शरद पोंक्षे : ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे हे देखील नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेले पाहायला मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान शरद पोंक्षे यांनी एका विशिष्ट समाजाला राक्षसाची उपमा दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आता पाठ्यपुस्तकातून शिकवला जाणार नाही. शिवाजी महाराजांमुळे एक विशिष्ट धर्मिय लोकांना दुखावल्या सारखे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या लढाया आणि इतिहास शिकवण्यास तो समाज दुखावेल. तो समाज दुखावलेला अनेक वेळा चालत नाही. राक्षसाला राक्षस म्हणायचे नाही तर, मग काय म्हणायचं? असा सवाल एका विशिष्ट धर्माला उद्देश शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे देखील काहीप्रमाणात वाद निर्माण झाला होता.

अभिनेते किरण माने : एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या विरोधात आपण पोस्ट करत असल्यामुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकण्यात आले असल्याचा आरोप अभिनेते किरण माने यांनी केला होता. गेल्यावर्षी "मुलगी झाली रे" या मालिकेतून अभिनेते किरण माने यांना तडकाफडकी काढून टाकण्यात आले होते. आपण एका विशिष्ट राजकीय पक्ष विरोधात सातत्याने भूमिका घेत असल्यामुळे आपल्यावर ही कारवाई संबंधित चैनलने केला असल्याचा गंभीर आरोप अभिनेत्यांनी केला होता. किरण माने यांच्या या गंभीर आरोपानंतर यामध्ये इतरही राजकीय पक्षांनी उडी घेत मालिकेच्या प्रोडक्शन हाऊसला याबाबत जाब विचारला होता. चॅनलच्या कारवाईमुळे राज्याच्या राजकीय वातावरणही तापले होते.

हेही वाचा - State Government Action : राज्य सरकार विरोधात बोलणाऱ्या 'या' व्यक्तींवर झाली कारवाई; वाचा, सविस्तर...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.