ETV Bharat / city

मुंबईतील नामांकित दहीहंड्या रद्द तरी बाल-गोपाळांचा उत्साह कायम - Dahihandi canceled in Mumbai

महाराष्ट्रातील पूरग्रस्त परिस्थितीमुळे मुंबईतील बहुतांश दहीहंडी आयोजकांनी हा उत्सव यंदा रद्द केला आहे.

मुंबईतील दहीहंडी उत्सव
author img

By

Published : Aug 24, 2019, 11:50 AM IST

मुंबई - शहरातील दहीहंडी उत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र, यंदा सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीमुळे मुंबईतील बहुतांश आयोजकांनी दहीहंडी उत्सव रद्द केला आहे. आयोजनकांनी दहीहंडीच्या ऐवजी पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील दहीहंडी उत्सव

महाराष्ट्रात खास करून सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरामुळे मुंबईतील ५० ते ६० टक्के दहीहंड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दहीहंडी शोधत पथकांना फिरावे लागणार आहे. मुंबईच्या गल्लीबोळात दरवर्षी हंडीचा उत्साह असतो. अपवाद वगळता यावर्षी तो म्हणावा तितका नाही. जांबोरी मैदानात लागणारी सचिन अहिर यांची तसेच बोरिवलीत मानाची समजली जाणारी प्रकाश सुर्वे, घाटकोपर येथील राम कदम यांची दहीहंडी यावेळी रद्द करण्यात आली आहे. तसेच ज्यांनी दहीहंडी लावल्या आहेत, त्यांनी साध्या पद्धतीने दहीहंड्या लावून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

शहरात इतर ठिकाणच्या दहीहंड्या रद्द करण्यात आल्या असल्यातरी दादर येथे आयर्न गल्लीत दहीहंडी साजरी करण्यात येत आहे. मात्र, ही दहीहंडी सुद्धा पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी उभारली आहे. दरम्यान, काल मध्यरात्री रात्री कृष्णजन्म साजरा झाला. अनेक पथकांनी रात्री १२ वाजता दहीहंड्या फोडल्या. आज सकाळी मंदिरात पूजा करुन बजरंग बली की जयच्या घोषात हंडी शोधण्यासाठी पथके बाहेर पडली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.