ETV Bharat / city

BJP Teachers Front Demand : कोरोना ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यातील शिक्षकांना "वर्क फ्रॉम होम" करू द्या - अनिल बोरनारे

author img

By

Published : Jan 5, 2022, 6:48 PM IST

Updated : Jul 23, 2022, 10:52 AM IST

राज्यात कोरोना व ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे मुंबईसह ठाणे, नवी मुंबई व इतर भागात इयत्ता पहिली ते नववी व अकरावीचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. ऑनलाईन शिक्षण देण्याचे आदेश काढले असून शिक्षकांना मात्र, विनाकारण शाळेत बोलावले जात आहे. शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करू द्यावे ( BJP Teachers Front Demand ) अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी ( BJP leader Anil Bornare Demand ) केली आहे.

BJP leader Anil Bornare Demand
राज्यातील शिक्षकांना "वर्क फ्रॉम होम" करू द्या

मुंबई - कोरोना व ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात मुंबईसह ठाणे, नवी मुंबई व इतर भागात इयत्ता पहिली ते नववी व अकरावीचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. ऑनलाईन शिक्षण देण्याचे आदेश काढले असून शिक्षकांना मात्र, विनाकारण शाळेत बोलावले जात आहे. शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करू द्यावे अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे ( BJP Teachers Front Demand ) प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे ( BJP leader Anil Bornare Demand ) यांनी केली आहे.

शिक्षकांना संसर्गाचा धोका -

देशात वाढत्या कोरोनाच्या संक्रमणामुळे केंद्र शासनाच्या कार्यालयात ५० टक्के उपस्थिती केली आहे. मुंबईतील वाढती संख्या पाहता इयत्ता दहावी बारावी वगळता इतर वर्गाचे ऑनलाईन शिक्षण देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तथापि इयत्ता पहिली ते नववी व अकरावीच्या शिक्षकांना दररोज शाळेत बोलावले जात आहे. ऑनलाईन शिक्षण घरुनही होत असल्याने उगीच शिक्षकांना बोलावणे गैर आहे. त्यामुळे विनाकारण लोकलमध्ये गर्दी होते व कोरोना संक्रमणाचा धोका अधिक वाढतो त्यामुळे दहावी व बारावी वगळता इतर वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करू द्यावे अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे. याबाबद त्यांनी शिक्षणमंत्री शिक्षण आयुक्त आणि शिक्षण सचिवांकडे पत्र सुद्धा पाठविले आहे.

या कारणांमुळे शाळा बंद -

मुंबईसह राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना व ओमायक्रोनच्या रुग्णवाढ हा चिंतेचा विषय ठरु लागला होता. त्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते नववी व अकरावीचे वर्ग बंद करून ऑनलाईन शिक्षण देण्याचे आदेश काढले आहे. रुग्णवाढ असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाने सांगितले आहे. मुंबईत ही पहिली ते आठवीच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या. मात्र पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी शाळांबाबत अखेर निर्णय घेतलाय.

हेही वाचा - Kalicharan Maharaj get Police Custody : कालीचरण बाबाला एक दिवसाची पोलीस कोठडी, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश

Last Updated : Jul 23, 2022, 10:52 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.