मुंबई : पश्चिम रेल्वेवर चालू केलेल्या एसी लोकलला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड वारंवार बघायला भेटत आहे. आज सायंकाळी चर्चगेट स्थानकातून विरारसाठी निघालेल्या १९:४३ च्या ऐसी लोकलच्या विरार बाजूच्या डब्यात एसी यंत्रणा मुंबई सेंट्रल स्थानकापासून बंद (Due to close AC local ran with open doors) झाली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यांची घुसमट होऊ लागली. ट्रेनमध्ये असलेल्या मोटरमन बरोबर संपर्क करायच्या यंत्रणेवर वारंवार संपर्क करूनही प्रवाशांचा संपर्क होत नव्हता. अशात वाढता उकाडा व डब्यात होणारी घुसमट यामुळे प्रवाशी प्रचंड (local ran with open doors causing passengers anger) संतापले.
दरवाजे उघडे ठेऊन लोकल प्रवास : अंधेरी स्थानकात ही ट्रेन आली असता टेक्निशियन या डब्यात चढले. परंतु त्यांच्याने काही न झाल्याने कसे तरी अंधेरी स्थानकात प्रवाशांनी दरवाजे बंद होऊ दिले. परंतु बोरिवली स्थानकात ट्रेन पोहचल्यावर जोपर्यंत ऐसी यंत्रणा चालू होत नाही, तोपर्यंत दरवाज्यातून हटणार नाही. ट्रेन पुढे जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा प्रवाशांनी घेतला. रेल्वे पोलीस यंत्रणा, कर्मचारीसुद्धा यादरम्यान पोहचले. पण, ते ही हतबल झाले. अखेर बोरिवलीवरून दरवाजे उघडे ठेवूनच एसी लोकल विरारपर्यंत पुढे नेण्याची नामुष्की रेल्वे प्रशासनाला (Local Ran With Open Doors) ओढवली.
प्रवाशांची आरडाओरड : एक तर एसी लोकलला पश्चिम रेल्वेवर प्रवाशांचा मोठा प्रतिसाद भेटत आहे. त्यामुळे सायंकाळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यात एसी यंत्रणा बंद झाल्याने बंद खिडक्या, दरवाज्यामुळे प्रवाशांची आतल्याआत डब्यात घुसमट होऊ लागली. बरेच वयस्कर प्रवाशी ज्यांना पुढे जायचे होते, ते घाबरून अंधेरी स्थानकात उतरले. तर डब्यात अरे कोई मार जायेगा, असे सांगत प्रवाशांनी आरडाओरड चालू केली. ज्यांना दमा, अस्थामाचा त्रास आहे, अशा प्रवाशांसाठी हे फार धोकादायक असल्याचे हेमंत कानोजिया या ५५ वर्षीय प्रवाशांनी (Western Railway) सांगितले.