मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात गेल्या काही महिन्यांपासून अमली पदार्थ तस्करीच्या संदर्भात मुंबई पोलिसांच्या कारवाईच्या हालचाली वाढलेल्या असून जानेवारी 2021 ते मार्च 2021 या तीन महिन्यांच्या काळात मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे.
35 कोटी 22 लाख 88 हजार 661 रुपयांचे अमली पदार्थ जप्त-
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या वेगवेगळ्या अमली पदार्थ तस्करीच्या कारवाईत मोठी भर पडलेली आहे . जानेवारी ते मार्च 2021 या तीन महिन्याच्या काळामध्ये मुंबई पोलिसांनी तब्बल 35 कोटी 22 लाख 88 हजार 661 रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. आतापर्यंत तब्बल 1111 गुन्हे दाखल करत 1202 दोन आरोपींना अटक करण्यात आली असून 3104 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थांची किंमत 10 कोटी 55 लाख 98 हजार-
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या तीन महिन्यात हेरॉईन अमली पदार्थांच्या तस्करी संदर्भात 3 गुन्हे दाखल केले असून 3 आरोपींना अटक करून तब्बल 66 लाख 55 हजार रुपयांचे हेरॉईन जप्त केलेले आहे. चरस या अमली पदार्थांच्या तस्करीत 17 गुन्हे दाखल करत 31 आरोपींना अटक करण्यात आलेली असून 40 किलो चरस जप्त करण्यात आलेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थांची किंमत 10 कोटी 55 लाख 98 हजार एवढी आहे.
कोकेन या अमली पदार्थाच्या संदर्भात 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून 2 आरोपींना अटक करत तब्बल 2 कोटी 1 लाख रुपयांचे कोकेन अमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत.
गांजा अमली पदार्थाची सगळ्यात जास्त तस्करी-
मुंबई शहरात सध्याच्या घडीला गांजा अमली पदार्थाची सगळ्यात जास्त तस्करी करण्यात येत असून मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने 105 गुन्हे दाखल करत 117 आरोपींना अटक केली आहे. आतापर्यंत 2900 दोन किलो गांजा हस्तगत करण्यात आलेला असून आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 5 कोटी 64 लाख 55000 एवढी आहे
एमडी म्हणजेच मेफेड्रोनएमडी म्हणजेच मेफेड्रोन ( कुत्ता टॅबलेट) या अमली पदार्थाची तस्करी संदर्भात आतापर्यंत 40 गुन्हे दाखल करण्यात आले असून 52 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत 41 किलो एमडी हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थाची किंमत 15 कोटी 99 लाख एवढी आहे.
अमली पदार्थांच्या इतर प्रकरणांमध्ये 16 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 23 आरोपींना अटक करण्यात आलेली असून 121 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 35 लाख 78 हजार एवढी आहे.
अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर कारवाई -
अमली पदार्थांची तस्करी मध्ये आरोपींना अटक करण्यात येत असताना मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थांचे सेवन करणार्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई केली आहे. गेल्या 3 महिन्यांमध्ये अमली पदार्थांचे सेवन करण्याच्या संदर्भात 928 गुन्हे नोंदवण्यात आले असून याप्रकरणी आतापर्यंत 974 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
हेही वाचा - कोरोनाचा रेल्वेला फटका : प्रवासी नसल्याने राज्यांतर्गत 3 विशेष एक्स्प्रेस गाड्या रद्द