मुंबई- कांदिवली येथील अमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी अमली पदार्थ तस्कराला अटक केली आहे. या व्यक्तीची झडती घेतली असता, त्याच्याकडून 10 लाख 80 हजार रुपयांचे 36 ग्रॅम कोकेन आणि 11 लाख 40 हजार रुपयांचे 144 ग्रॅम एम. डी. जप्त करण्यात आले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त दत्ता नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
आरोपीला अटक
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गोरेगावच्या पशुवैद्यकीय महाविद्यालय परिसरात एक व्यक्ती रात्रीच्यावेळी संशयास्पदरित्या उभा असल्याचे पोलिसांना आढळून आले. दरम्यान या व्यक्तीची चौकशी केली असता, त्याने उडवाडवीची उत्तरे दिली. पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे 36 ग्रॅम कोकेन आणि 144 ग्रॅम एम.डी. आढळून आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.
हेही वाचा - ''वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप'' व इंग्लंड विरुध्दच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा