ETV Bharat / city

द्रोपदी मुर्मू यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडणून देणार; भाजप नेत्यांच्या बेठकीत निर्धार - Draupadi Murmu

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना अधिकाधिक मतमूल्याने निवडून आणण्यासाठी मुंबईतील हॉटेल लीला येथे भाजप नेत्यांची त्याचबरोबर शिवसेना बंडखोर आमदारांची बैठक झाली.

द्रोपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत भाजपची बैठक

author img

By

Published : Jul 14, 2022, 8:36 PM IST

मुंबई - एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना अधिकाधिक मतमूल्याने निवडून आणण्यासाठी मुंबईतील हॉटेल लीला येथे भाजप नेत्यांची त्याचबरोबर शिवसेना बंडखोर आमदारांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, रामदास आठवले, पियुष गोयल, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे भाजप प्रभारी सिटी रवी तसेच भाजपचे सर्व आमदार, खासदार त्याचबरोबर एकनाथ शिंदे गटाचे आमदार उपस्थित होते.

द्रोपदी मुर्मू यांचे मुंबईत स्वागत
द्रोपदी मुर्मू यांचे मुंबईत स्वागत

नितीन गडकरी उपस्थित - राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार द्रोपदी मुर्मू यांच मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ शेजारी असलेल्या लीला या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, नारायण राणे, रामदास आठवले तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थित होते.

आदिवासी नृत्य सादर केले - मुर्मु या आदिवासी समाजातील आहेत. त्यांनी त्या समाजासाठी कामही केले आहे. आज त्यांच्या नावाची देशभर चर्चा आहे. त्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्या प्रथमच मुंबईत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा या भागातून आलेल्या आदिवासी बांधवांनी आदिवासी तारपा नृत्य तसेच विविध आदिवासी नृत्य सादर करून त्यांचे स्वागत केले.

हेही वाचा - Booster Dose: करोना प्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा मोफत देण्याचा केंद्राचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.