ETV Bharat / city

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यंदा घरी राहून साजरी करा, रामदास आठवलेंचे आवाहन

देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट गडद होत आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत्या १४ एप्रिल रोजी घराबाहेर न पडता आपापल्या घरीच राहून साजरी करा. कोरोनाशी एकजूटीने लढा देण्यासाठी आंबेडकरी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

Dr.  Babasaheb Ambedkar Jayanti
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti
author img

By

Published : Apr 7, 2021, 8:21 PM IST

Updated : Apr 7, 2021, 8:31 PM IST

मुंबई - देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट गडद होत आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत्या १४ एप्रिल रोजी घराबाहेर न पडता आपापल्या घरीच राहून साजरी करा. कोरोनाशी एकजूटीने लढा देण्यासाठी आंबेडकरी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मंगळवारी महाराष्ट्रमध्ये 55 हजार तर मुंबईमध्ये दहा हजार कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामुळे मी आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरच्या घरी साजरी करावी. घरच्या घरीच जयंतीचा आनंद उत्सव साजरा करावा. त्याबरोबर दादर येथील चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी करु नये, त्य ऐवजी शासनाचे नियम पाळून आपापल्या भागात रक्तदान शिबिर घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी, असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले.

रामदास आठवले आंबेडकरी जनतेला आवाहन करताना
आज मलबार हिल येथील सह्याद्री शासकीय अतिथीगृहात येत्या 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 130 वा जयंती उत्सव साजरा करण्याबाबत आयोजित केलेल्या बैठकीत आढावा घेतल्यानंतर रामदास आठवले यांनी हे आवाहन केले. यावेळी सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, रिपाइं राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, मनपा चे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, नागसेन कांबळे, सहाय्यक मनपा आयुक्त किरण दिघावकर, सामाजिक न्याय सह सचिव दिनेश डिंगळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.कोविड - 19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याबाबतचे शासनाने स्पष्ट नियमावलीचे पत्रक काढावे, अशी सूचना रामदास आठवले यांनी अधिकाऱ्यांना केली. 14 एप्रिलपासून मुंबई मनपाने कोविडच्या या काळात गरिबांना भोजनदान देण्यात यावे. तसेच 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी 5 लोकांना परवानगी द्यावी, अशीही सूचना आठवले यांनी केली.
चैत्यभूमीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा -
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी स्मारक येथील स्तूप जीर्ण झाला असून मोडकळीस आला आहे. चैत्यभूमीच्या पवित्र ऐतिहासिक स्तुपाची दुरुस्ती तातडीने झाली पाहिजे. जर कधी चैत्यभूमीचा स्तूप कोसळला तर देशभरातील आंबेडकरी जनतेचा उद्रेक होईल आणि त्याचे दुष्परिणाम मुंबई मनपाला व राज्य शासनाला भोगावे लागतील, असा इशारा रामदास आठवले यांनी यावेळी दिला. चैत्यभूमीचे लवकर ट्रक्चरल ऑडिट करावे अशी सूचना ना रामदास आठवले यांनी मनपा प्रशासनाला केली.चैत्यभूमीच्या विकासासाठी निधी मनपाकडे उपलब्ध असताना स्तूपाची दुरुस्ती का केली जात नाही, असा प्रश्न रामदास आठवले यांनी मनपा अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर चैत्यभूमी ही खाजगी जागेवर उभी असल्याने मनपाला तातडीने निर्णय घेण्यास असमर्थता दर्शविली.

Last Updated : Apr 7, 2021, 8:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.