ETV Bharat / city

...तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना कसा करणार? - डॉ. अविनाश भोंडवे - vaccination in maharashtra

अनेक रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा, रुग्णालयात बेड आणि औषधे मिळण्यात अडचणी येत आहेत. तसेच महत्त्वाचे म्हणजे मृतांचा आकडा देखील वाढला आहे. तसेच तिसऱ्याला लाटेचा सामना करण्यासाठी लसीकरण हेच एकमेव उपाय असल्याने अशा पद्धतीने लसीकरणाला उशीर केल्यास तिसऱ्या लाटेचा सामना करणे सुरक्षित राहणार नसल्याचे डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले.

डॉ. अविनाश भोंडवे
डॉ. अविनाश भोंडवे
author img

By

Published : May 20, 2021, 7:59 PM IST

पुणे - भारतात सध्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. यात 18 ते 40 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र लसीचा पुरेसा साठा उपलब्ध न झाल्यामुळे काही राज्यांनी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण स्थगित केले आहे. त्यासोबतच केंद्र सरकारने कोरोना झालेल्या रुग्णांना 90 दिवसानंतर लस दिली जावी, असेही र्देश दिले आहेत. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयावर इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी आक्षेप घेतला आहे. 'कोरोनाने बरे झालेल्या रुग्णांना 90 दिवसानंतर लस देणे हे धोकादायक असून या काळात त्यांना पुन्हा लागण होण्याची भीती आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या धोरणाचा पुनर्विचार करावा', असे भोंडवे यांनी म्हटले आहे.

...तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना कसे करणार?

'कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी लसीकरण कधी करावे' -

एखाद्या व्यक्तीला कोरोना होऊन गेला तर त्या व्यक्तीने लसीकरण केव्हा करायचे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याआधी जेव्हा चर्चा झाली तेव्हा 9 महिन्यानंतर लस देण्यात यावी असे ठरवण्यात आले होते. मात्र या निर्णयानंतर देशातील काही डॉक्टरांनी आक्षेप घेतला आणि त्यांनतर पुन्हा बदल करण्यात आले आहे. कोविशिल्ड लसीबाबत 90 दिवसांनी लसीचा निर्णय घेण्यात आला, त्यात जर एखाद्याला पहिल्या डोसनंतर कोरोना झाला तर त्याला दुसरा डोस घेता येऊ शकतो. पण कोवॅक्सीनबाबत मात्र असे नाही. जर एखाद्याला पहिल्या डोसनंतर कोरोना झाला तर त्याने दुसरा डोस कधी घ्यायचा, असा सवाल भोंडवेंनी केला.

'लसीच्या अपुऱ्या पुरावठ्याचा फटका?'

लसीकरणाबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाले असून पहिल्या डोसनंतर दुसरा डोस कधी घ्यायचा तसेच कोरोना झालेल्यांनी कधी लस घ्यायची याबाबत सतत बदलत असलेल्या नियमावलीने लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात काळानुसार बदल करणे गरजेचे असतात आणि ते होत असतात. पण लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे लसीकरणात बदल होत आहे की काय असे नागरिकांना वाटू लागले आहे. म्हणून आता या लसीकरणाच्या नियमावलीबाबत केंद्राने खुलासा करावा, असे त्यांनी व्यक्त केले.

'मग तिसऱ्या लाटेच सामना करणं सुरक्षित राहणार नाही'

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होण्याची गरज आहे. देशात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा, रुग्णालयात बेड आणि औषधे मिळण्यात अडचणी येत आहेत. तसेच महत्त्वाचे म्हणजे मृतांचा आकडा देखील वाढला आहे. तसेच तिसऱ्याला लाटेचा सामना करण्यासाठी लसीकरण हेच एकमेव उपाय असल्याने अशा पद्धतीने लसीकरणाला उशीर केल्यास तिसऱ्या लाटेचा सामना करणे सुरक्षित राहणार नसल्याचे भोंडवे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.