ETV Bharat / city

...तर ताकदीने बेळगावात उतरावे लागेल, संजय राऊत यांचा इशारा - shivsena

हा एकतर राजकीय पक्षाचा किंवा सरकारचा विषय नाही. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत एक शिष्टमंडळ तत्काळ बेळगावला पाठविले पाहिजे. सध्या बेळगावला महाराष्ट्रात आणायचे की नाही ते आम्ही बघूच. पण सध्या तिथल्या लोकांना संरक्षणाची गरज आहे.

...तर ताकदीने बेळगावात उतरावे लागेल, संजय राऊत यांचा इशारा

author img

By

Published : Mar 13, 2021, 11:35 AM IST

मुंबई : बेळगावातील परिस्थिती चिघळत असेल तर त्याला केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका करताना या मुद्द्यावर केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. बेळगावात मराठी लोकांवर सुरू असलेल्या अत्याचाराची दखल कुणी घेत नसेल तर महाराष्ट्र सरकारला सर्व ताकदीने बेळगावात उतरावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

...तर ताकदीने बेळगावात उतरावे लागेल, संजय राऊत यांचा इशारा

तर ताकदीने बेळगावात उतरावे लागेल

बेळगावात कन्नड वेदीका वाले हल्ले करत आहेत. हा एकतर राजकीय पक्षाचा किंवा सरकारचा विषय नाही. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत एक शिष्टमंडळ तत्काळ बेळगावला पाठविले पाहिजे. सध्या बेळगावला महाराष्ट्रात आणायचे की नाही ते आम्ही बघूच. पण सध्या तिथल्या लोकांना संरक्षणाची गरज आहे. बेळगवातील मराठी लोकांवर गेल्या आठ दिवसांपासून अत्याचार, दडपशाही सुरू आहे. त्याची दखल जर कुणी घेत नसेल महाराष्ट्र सरकारला सर्व ताकदीने बेळगावात उतरावे लागेल असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मी बेळगावला जाऊ शकतो

मी स्वतः बेळगावला जाण्याचा प्रयत्न करत आहे. मी बेळगावला जाऊ शकतो. बेळगाव हा या देशाचा भाग आहे. आम्ही मराठी माणसे तिकडे जायचं म्हटलं की आम्हाला रोखता. बंदुका दाखवता. आमच्याकडे बंदुका नाहीत का? असा इशाराही राऊत यांनी दिला आहे. जर कर्नाटकने कठोर पावले उचलण्यास भाग पाडले, तर ती सरकारी पावले नसतील ती पावले राजकीय असतील. मग डोके फुटली म्हणून रडत दिल्लीला जाऊ नका असे राऊत यांनी म्हटले आहे.

भावनिक वातावरण निर्मितीचा प्रयत्न
कर्नाटक सरकार बेळगावमध्ये अतिक्रमण करत आहे. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही. तोपर्यंत काही काम करता येणार नाही. तिथे न्यायालयाचा अवमान केला जातोय. मराठी माणसाचे डोके फोडले जात असतील तर आमचे हात बांधलेले नाही. ती ताकद आमच्या हातात सुद्धा आहे. केंद्र सरकार अशा प्रकारचे वाद पेटवून भावनिक वातावरण निर्माण करत आहे असेही राऊत म्हणाले. हिंसक संघटनाना, दहशतवादी संघटनांना हाताशी पकडून हे वातावरण तयार केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा - भाजपशासित सात राज्यात कोट्यवधींचा 'स्कॅनिया बस' घोटाळा; काँग्रेसने केली एनआयएमार्फत चौकशीची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.