ETV Bharat / city

डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात, राज्य सरकारची केंद्राकडे कारवाईची मागणी - दाऊद इब्राहिम

दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराचीमध्ये आहे, अशी माहिती हसीना पारकरचा मुलगा आणि दाऊद इब्राहिमची भाचा अलिशा पारकर याने ईडीला दिली. मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करणार्‍या ईडीने केलेल्या चौकशीदरम्यान हसिना पारकर यांचा मुलगा अलिशा पारकरने ईडीला ही माहिती दिली.

डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराचीमध्ये अलिशा पारकर ईडीला माहिती- सूत्र

author img

By

Published : May 24, 2022, 1:31 PM IST

Updated : May 24, 2022, 2:07 PM IST

मुंबई - अंडर वर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराचीमध्ये आहे, अशी माहिती हसीना पारकरचा मुलगा आणि दाऊद इब्राहिमची भाचा अलिशा पारकर याने ईडीला दिली. मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करणार्‍या ईडीने केलेल्या चौकशीदरम्यान हसिना पारकर यांचा मुलगा अलिशा पारकरने ईडीला अनेकप्रकारची माहिती ईडीला दिल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. हसीना पारकरचा मुलगा आणि दाऊदचा पुतण्या अलिशा पारकरला ईडीने अनेकवेळा चौकशीसाठी समन्स पाठवले होते.

  • Central Govt should take action on it. Till now the location was not known but now if the location is clear then the Central govt should take it seriously and take the action: Maharashtra Home Minister Dilip Walse Patil on Dawood Ibrahim pic.twitter.com/V56OvHK6pI

    — ANI (@ANI) May 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
दाऊद इब्राहिम कराचीमध्ये - चौकशीदरम्यान अलिशा पारकरने ईडीला सांगितले की दाऊद इब्राहिम पाकिस्तानच्या कराचीमध्ये आहे आणि माझ्या जन्मापूर्वी दाऊदने मुंबई सोडली होती. अलीशाह पारकरने ईडीला आपल्या जबाबात सांगितले की दाऊद इब्राहिम हा माझा मामा आहे आणि तो 1986 पर्यंत डंबरवाला भवनमध्ये राहत होता. मी माझ्या अनेक नातेवाईकांकडून ऐकले आहे की दाऊद इब्राहिम कराची पाकिस्तानमध्ये आहे. त्यांनी भारत सोडला तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता आणि मी किंवा माझे कुटुंबीय त्यांच्या संपर्कात नाही. कधीकधी ईद आणि इतर सणांच्या वेळी माझे मामा दाऊद इब्राहिमची पत्नी मेहजबीन ही माझी पत्नी आयशा आणि माझ्या बहिणींच्या संपर्कात असतात.
दिलीप वळसे पाटील यांची केंद्राकडे कारवाईची मागणी - दरम्यान यासंदर्भात केंद्रसरकारने कारवाई केली पाहिजे अशी भूमिका राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली आहे. आतापर्यंत दाऊदचा ठावठिकाणी माहीत नव्हता. आता तो समजला पाहिजे. त्यामुळे केंद्राने कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली.

Last Updated : May 24, 2022, 2:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.