मुंबई - एका मालकाने आपल्या पाळीव श्वानाला मुंबईहून चेन्नईला घेऊन जाण्यासाठी चक्क एअर इंडियाची संपूर्ण बिझनेस केबिन बुक केल्याची माहिती समोर येत आहे. त्यासाठी श्वानाच्या मालकाने दोघांच्या प्रवासासाठी तब्बल 2 लाख 50 हजार रुपयांहून अधिक खर्च केला आहे.
हेही वाचा - ....आता कोथळा काढायची भाषा केली जाते; शरद पवारांनी नेत्यांची केली कानउघडणी
- मुंबई ते चेन्नई विमान प्रवास-
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणाऱ्या एका नागरिकाने आपल्या श्वानाला मुंबईहून चेन्नईला घेऊन जाण्यासाठी एअर इंडियाची संपूर्ण बिझनेस केबिनच बुक केली होती. रिपोर्टनुसार, मालतेसे समाल्टीज फरबॉल या प्रजातीचा हा श्वान आहे. बुधवारी सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईवरून सुटणाऱ्या एअर इंडिया फ्लाईट एल -671 या विमानाने मालकासह श्वानानेही प्रवास केला. एअर इंडिया ए-320 एअरक्रॉफ्टमध्ये क्लास केबिनच्या एकूण 12 सीट्स असतात. मुंबई ते चेन्नई प्रवासासाठी एअर इंडिया फ्लाईटच्या बिझनेस क्लास तिकीटासाठी सुमारे 20 हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे त्या नागरिकाने आपल्या श्वानासाठी चक्क एअर इंडियाची संपूर्ण बिझनेज केबिन बुक केली आहे.
- काय आहे नियम?
एअर इंडियाच्या फ्लाईट पॉलिसीनुसार, श्वान, मांजरी आणि पक्षी यांना विमानाने प्रवास करण्याची मुभा आहे. परंतु, या प्राण्यांचे व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट सोबत असणे गरजेचे आहे. एका प्रवाशाला दोन पाळीव प्राणी सोबत नेण्याची परवानगी आहे. प्राण्यांच्या शरीराच्या आकारानुसार, त्यांना केबिनमध्ये किंवा कार्गोमधून नेता येऊ शकते. बिझनेस क्लासमधून प्रवास करणारे प्राणी केबिनच्या शेवटच्या रो मध्ये बसलेले असतात. यासोबतच भावनिक आधार देणाऱ्या प्राण्यांनासुद्धा काही एअरलाईन्स प्रवासाची मुभा देत आहेत.
हेही वाचा - corona update : ३ हजार ३९१ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, ८० मृत्यू